Tandav web series विरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात FIR दाखल

Tandav web series विरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात FIR दाखल
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून तांडव ही वेब सिरीज चर्चेत आहे. सिरीजमध्ये हिंदू देव देवतांच्या प्रतिमांचा अपमान केल्याप्रकरणी भाजप नेते या सिरीजच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. (FIR lodged at Ghatkopar police station against Tandav web series ) सिरीजविरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. 

तांडव या वेब सिरीज विरोधात गेल्या काही दिवसांपासून वादंग उठले असून, सिरीजमधील काही प्रसंगातून हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. सिरीजविरोधात अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आवाज उठवला असून सिरीजचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात होती. भाजप नेते राम कदम ( MLA Ram kadam )   यांनी गेल्या काही दिवसांपासून तांडव सिरीज विरोधात आंदोलन सुरू केले आहे. ही तक्रार घेऊन ते अॅमेझॉन प्राईमच्या ( amazon prime)  कार्यालयातही गेले होते. सायबर सेलकडेही तक्रार त्यांनी केली होती. त्यांच्या तक्रारी नंतर घाटकोपर पोलिसांनी IPC art 153 A, 295 A, 505 (2) नुसार सिरीजविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीमध्ये अभिनेता सैफ अली खान (Saif Ali khan) तसेच दिग्दर्शक अली अब्बास जफरचे (Ali Abbas Zafar)  देखील नाव असल्याची माहिती समोर येत आहे.

राम कदम यांनी माध्यमांशी संवाद साधतांना म्हटले की, संबधित सिरीज मध्ये असेलेले प्रसंग हिंदूच्या भावना दुखवणारे आहेत, तसेच हिंदू देवतांचा अपमान करणारे सुद्धा आहेत. आघाडी सरकार त्याविरोधात लवकर का कारवाई करत नाही?  शिवसेनेने आपले हिंदुत्व सोडेले का ? असा सवालही कदम यांनी केला आहे.

-----------------------------------------------

FIR at Ghatkopar police station against Taandav web series ram kadam agitation amezon amazon prime

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com