Fire Accident : कांजूरमार्गमध्ये रहिवासी इमारतीत आग; 5 जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fire Accident in residential building in Kanjurmarg 5 injured fire brigade mumbai police

Fire Accident : कांजूरमार्गमध्ये रहिवासी इमारतीत आग; 5 जखमी

मुंबई : मुंबईतील कांजूरमार्ग भागातील कर्वे नगरमध्ये असलेल्या म्हाडा कॉलनीतील इमारतीला रविवारी सकाळी अचानक आग लागली. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागली. मुंबई महानगरपालिकेने आगीत पाच जण जखमी झाले असून सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.विमल जालिंदर सकटे, अलका सकटे , नताशा सकटे , अंजली मावळणकर आणि करुणा उबाळे अशी जखमींची नावे आहेत. सध्या आगीचे कारण समजू शकलेले नाही. मात्र, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.

कांजूरमार्ग पूर्वेकडील कर्वे नगर येथील म्हाडा कॉलनीतील इमारत क्रमांक पी-2 मध्ये सकाळी 9.30 च्या सुमारास आग लागली. माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि इमारतीच्या 14व्या मजल्यावर लागलेली आग विझवण्याचे काम सुरू केले.

सकाळी 9.57 वाजताच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली. इमारतीच्या तळमजल्यावरील वीज मीटरच्या केबिनमधून आग पसरली, असे अधिकाऱ्याने सांगितले. तळमजल्यावरील मीटर बॉक्स रुमपासून सुरू झालेली आग तारांच्या माध्यमातून वरच्या मजल्यापर्यंत पसरली. पाचही जखमींना जवळच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेण्यात आले. गुदमरल्यामुळे पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाचही जणांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

टॅग्स :fire