मुंबईत आगीच्या घटनांची मालिका सुरूच; अंधेरीच्या प्राईम मॉलला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai
मुंबईत आगीच्या घटनांची मालिका सुरूच; अंधेरीच्या प्राईम मॉलला आग

मुंबईत आगीच्या घटनांची मालिका सुरूच; अंधेरीच्या प्राईम मॉलला आग

मुंबई: अंधेरी पश्चिममध्ये असणाऱ्या प्राईम मॉलला भीषण आग लागल्याची माहिती मिळते आहे. अल्फा इरला रोडवर असलेल्या या प्राईम मॉलला सकाळी १०:३० च्या सुमारास ही आग लागली असून, चिंतेची बाब म्हणजे या मॉलजलवळ कूपर हॉस्पिटल आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये आगीच्या अनेक घटना घडल्या असून, ह्युंदाईच्या शोरुमला आग लागल्याची घटना घडली होती.

प्राईम मॉलला लागलेली ही आग लेव्हल ४ ची आग असल्याचे समजते आहे. घटनास्थळावर आतापर्यंत अग्निशमन दलाचे ०७ जम्बो टँकर, १० फायर इंजिन दाखल झाले आहेत. तसेच १ श्वसन उपकरण वाहन आणि कंट्रोल पोस्ट सुद्धा दाखल झाल्याची माहिती आहे.

loading image
go to top