
Dombivli Fire Accident: डोंबिवली पूर्वेतील सदगुरू ऑटो स्पेअर पार्टच्या गोदामाला गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. आगीत गोदाम पूर्ण जळून खाक झाले आहे. दोन ते तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र यामुळे रहिवासी रहात असलेल्या इमारतीत तळमजल्यावर हे गोदाम असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.