Mumbai: झोपडपट्टीला भीषण आग,५० हून अधिक झोपड्या खाक; दोघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

Mumbai: झोपडपट्टीला भीषण आग,५० हून अधिक झोपड्या खाक; दोघांचा मृत्यू

मुंबई येथील मालाडमध्ये मोठी घटना घडली आहे. एका झोपडपट्टीला भीषण आग झाल्याची घटना समोर आली आहे. या आगीत जवळ जवळपास ५० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तर दोघांचा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

आगीची माहिती मिळताच, पोलिसांसह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

ही भीषण आग मालाड पुर्व जामरुशी नगर मध्ये लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झोपडपट्टी असलेल्या विभागात एका घरात आग लागली आणि तेथुन ती पसरली. मात्र, आगीचे कराण अस्पष्ट आहे. घरेलू गॅस सिलेंडर स्फोट आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.