भिवंडीत कापड डाईंग कंपनीला भीषण आग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

लाखोंचा माल जळून खाक 

भिवंडी ः  भिवंडी शहरातील कल्याण रोड आसबीबी परिसरात 
कापडावर रंगाची प्रक्रिया करणाऱ्या रूंगटा डाईग कंपनीच्या तीन मजली इमारतीला सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली आहे. ही आग कंपनीतील कामगारांच्या निदर्शनास येताच त्यांची धावपळ उडाली. त्यांनी कंपनी बाहेर रस्त्यावर धाव घेऊन पोलिस व भिवंडी पालिकेच्या अग्निशामकदलास याबाबतची माहिती दिली. मात्र तोवर कापडाच्या मालाने पेट घेतल्यामुळे या आगीने रौद्ररूप धारण केले.

हेही वाचा - एक वर्षाच्या मोहम्मदला घरबसल्या मिळाले सात कोटी

आग विझविण्यासाठी कल्याण डोंबिवली मनपा व ठाणे मनपाच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले त्यानंतर रासायनिक द्रव्य मिश्रित पाण्याचा वापर करून ही आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही आग कशा मुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. भिवंडी कल्याण महामार्गावर रस्ता दुरूस्तीचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळे पोलिसांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी धावपळ उडाली होती. वाहन कोंडीमुळे नोकरदार ,प्रवासी नागरीकांचे मोठे हाल झाले.दरम्यान शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीची नोंद घेऊन चौकशी सुरू केली आहे. 

महत्त्वाची बातमी - मुंबई महापालिकेत 37 हजार जागा रिक्त

सध्या भिवंडी महापालिका अग्निशामक दलाच्या 3 गाडया घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत कापडावर प्रक्रिया करणाऱ्या मशिनसह अन्य साधनसामुग्रीचे नुकसान झाले आहे. या ठिकाणी सध्या अग्निशामक दलाच्या जवानांकडून कुलिंगचे काम सुरू आहे. या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र कंपनीतील काही साधन सामुग्री साहित्य कापड जळून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

web title ः Fire engulfs textile dyeing company


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire engulfs textile dyeing company