
मोहम्मदचे वडील एका खासगी कंपनीमध्ये अकाऊटंट म्हणून काम करतात.
एक वर्षाच्या मोहम्मदला घरबसल्या मिळाले 7 कोटी
मुंबई : कोणाचा नशीब कधी आणि कसा चमकेल काही सांगता येत नाही. असाच काहीसं घडला आहे मोहम्मद सालाह या मुलाबरोबर अवघ्या एक वर्षाच्या मोहम्मदला तब्बल सात कोटी रुपयांची लॅाटरी लागली आहे. चिमुकल्या मोहम्मदला लागलेली ही लॅाटरी संपूर्ण जगात चर्चेचा विषय बनला असून त्याचे कुटुंबीय सध्या फार आनंदी आहेत.
हेही वाचा - मेट्रोमुळे झाकोळले ठाण्यातील थीम पार्क
एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मोहम्मदचे वडील रमीस रहमान (31) एका खासगी कंपनीमध्ये अकाऊटंट म्हणून काम करतात. मागील एक वर्षापासून रमीस दुबई ड्यूटी फ्री प्रमोशनमध्ये भाग घेत होते. यंदा त्यांनी आपल्या एक वर्षाच्या मोहम्मदच्या मुलाच्या नावे लॉटरीचे तिकीट निवडले होते. दरम्यान त्यातील विजेत्याचे नाव मंगळवारी काढण्यात आले, ज्यात मोहम्मद याचे नाव आल्याने रमीस फार आनंदी झाले. तब्बल १ मिलियन डॉलरची लॉटरी त्यांना लागली असून ही किंमत भारतीय रुपयांमध्ये तब्बल सात कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. या लॅाटरीनंतर रमीस यांनी आनंद व्यक्त केला असून या पैशांनी ते आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
महत्त्वाची बातमी - मुंबई महापालिकेत 37 हजार जागा रिक्त
मोहम्मद व त्याचे परिवार मुळचे भारतातील केरळ येथील असून सध्या अबुधाबी येथे वास्तव्यास आहेत. मोहम्मद येत्या 13 फेब्रुवारीला एक वर्षाचा होणार असून या वयातच तो कोट्याधीश झाला आहे्. सध्या या बातमीने जगभरातील समाज माध्यमांवर धुमाकुळ घातला आहे.
भारतीय शेतकरी झाला दुबईत करोडपती
लकी ड्रॅामुळे नशीब उजळलेली अनेक उदाहरणे असून युकेमध्ये होत असलेल्या एका लकी ड्रॅामध्ये देखील एका भारतीय शेतकऱ्याची किस्मत चमकली होती. नोकरीच्या शोधात दुबईत गेलेल्या एका भारतीय शेतकऱ्याला नोकरी न मिळाल्याने तो पुन्हा भारतात येण्यासाठी निघाला मात्र त्य़ाआधी आपल्या पत्नीकडून काही पैसे उधार घेऊन त्याने एक लॅाटरीचे तिकीट खरेदी केले. आश्चर्याची बाब म्हणजे त्याने तो लकी ड्रॅा जिंकला देखील ज्यामुळे त्याला तब्बल ४ मिलियन डॉलर इतकी रक्कम मिळाली भारतीय रुपयांमध्ये ही किंमत २८ कोटीहून ही अधिक आहे.
web title : One year old boy won seven crores in lottery
Web Title: One Year Old Boy Won Seven Crores Lottery
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..