अग्निशमन अधिकारी उत्कर्ष बोबडे यांचे निधन

हृदयविकाराचा झटका आहे आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
Mumbai
MumbaiSakal
Updated on

मुंबई : मुंबई (Mumbai) अग्निशमन (Firefighting) दलातील वरिष्ठ अग्निशमन केंद्र अधिकारी उत्कर्ष बोबडे (Utkarsh Bobade) (वय ३८) यांचे गुरूवारी ह्रदयविकाराच्या (Heart Attack) तीव्र झटक्याने निधन झाले. सध्या अग्निशमन दलाचे प्रशिक्षण सुरू असून गुरूवारी प्रशिक्षण आटोपल्यावर घरी गेल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आहे आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

बोबडे २००६ साली मुंबई अग्निशमन दलात दाखल झाले होते. सध्या ते वरिष्ठ अग्निशमन केंद्र अधिकारी पदावर नरिमन पॉईंट येथील केंद्रात कार्यरत होते. वडाळ्याच्या कमांडिंग सेंटरमध्ये त्यांचे प्रशिक्षण सुरू होते. या प्रशिक्षणात कृत्रिम श्‍वसन यंत्र वापरून २० किलो वजन उलचलून शिडी चढणे, गटारात उतरणे, पाईपातून झोपून पुढे येणे अशा विविध कवायती असतात. गुरूवारी सकाळी साडेसात ते दुपारी दीडपर्यंत त्यांनी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर घरी गेल्यावर ते विश्रांतीसाठी झोपले होते.

Mumbai
शेतकऱ्याच्या मुलाचे स्टार्टअप, घरीच बनविले कांदा छाटणी यंत्र

दरम्यान त्यांची कोणतीही हालचाल होत नसल्याने त्यांच्या पत्नीने त्यांना हलविण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना तातडीने नायर रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बोबडे यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी व सात वर्षांची मुलगी असा परिवार आहे, अशी माहिती अग्निशमन दलाच्या वतीने देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com