esakal | विमानवाहू युद्धनौका विक्रमादित्य वर आग
sakal

बोलून बातमी शोधा

विमानवाहू युद्धनौका विक्रमादित्य वर आग

विमानवाहू युद्धनौका विक्रमादित्य वर आग

sakal_logo
By
कृष्णा जोशी ः सकाळ वृत्तसेवा

मुंबईः भारताची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यवर (INS Vikramaditya)आज सकाळी किरकोळ आग (Fire On Board) लागल्याचे निदर्शनास आले. सध्या ही युद्धनौका कारवार बंदरात आहे. (Fire On Board Aircraft Carrier INS Vikramaditya)

हेही वाचा: मराठा आरक्षण: मुख्यमंत्री पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना लिहिणार पत्र

बोटीवरील खलाशांच्या राहण्याची व्यवस्था असलेल्या भागातून आज सकाळी धूर येत असल्याचे नौकेवरील नौसैनिकांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने हालचाल करून आग विझवली.

आगीत कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे निदर्शनास आले नाही. आगीच्या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती नौदलाच्या प्रवक्त्याने दिली.