esakal | स्फोटाने तारापूर औद्योगिक वसाहत हादरली, दोन जणांचा मृत्यू, 5 जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

स्फोटाने तारापूर औद्योगिक वसाहत हादरली, दोन जणांचा मृत्यू, 5 जखमी

स्फोटाने तारापूर औद्योगिक वसाहत हादरली, दोन जणांचा मृत्यू, 5 जखमी

sakal_logo
By
नाविद शेख

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील जखारिया लिमिटेड या कापड निर्मिती करणाऱ्या कारखान्यात शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास स्फोट झाला आहे. स्फोटात कारखान्यातील दोन कामगारांचा मुत्यु झाला आहे, एकाचा मृतदेह बेपत्ता आहे. स्फोटात कारखान्यातील पाच कामगार जखमी झाले आहेत. कारखान्यातील बॉयलर फाटल्याने स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. स्फोटामुळे कारखान्याला आग लागली होती. आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांननी दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविले आहे.

तारापूर औद्योगिक वसाहती मधील जखरिया टेक्स्टाईल या कारखान्यात शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाला आहे. स्फोटामुळे कारखान्याला आग लागली होती. कारखान्यात सात कामगार काम करीत होते. स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे.एक कामगाराचा मृतदेह कारखान्यात आढळून आला आहे, तर छोटेलाल सरोज नामक कामगार बेपत्ता आहे.पाच कामगार जखमी झाले आहेत, त्यांच्यावर बोईसर मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: अदर पुनावालांनी मुंढव्यात 13 फ्लोअरसाठी मोजले 464 कोटी

स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले होते.दोन तासांच्या प्रयत्नांनी कारखान्याला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.दरम्यान स्फोटाच्या तीव्रतेमुळे तीन ते चार किलोमीटरचा परिसरात स्फोटाचा आवाज ऐकू आला.

■जखमी कामगारांची नावे

अरविंद यादव,मुरली गौतम,अमित यादव,मुकेश यादव आणि उमेश राजवंशी

loading image
go to top