esakal | अदर पुनावालांनी मुंढव्यात 13 फ्लोअरसाठी मोजले 464 कोटी
sakal

बोलून बातमी शोधा

अदर पुनावालांनी मुंढव्यात 13 फ्लोअरसाठी मोजले 464 कोटी

अदर पुनावालांनी मुंढव्यात 13 फ्लोअरसाठी मोजले 464 कोटी

sakal_logo
By
नामदेव कुंभार

सीरम इंस्टिट्यूटचे (SII) सर्वेसर्वा अदर पुनावाला यांनी पुण्यातील मुंढवामध्ये मोठी खरेदी केली आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहेत. अदर पुनावाला यांच्या 'पुनावाला फायनान्स' या कंपनीनं मुंढव्यातील कमर्शियल टॉवरमध्ये 13 फ्लोअर विकत घेतले आहेत. याची किंमत तब्बल 464 कोटी रुपये आहेत. 27 कोटी 82 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क नुकतेच त्यांनी भरले. पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील अलीकडील हा सर्वात मोठा व्यवहार असल्याची चर्चा सुरु आहे. 'पुनावाला फायनान्स' यांनी प्रिस्टीन प्रॉपर्टीजकडून ही इमारत खरेदी करण्यात आल्याचं सांगितले जातेय.

अदर पूनावाला सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (SII) हे मुख्य कार्यकारी अधिकारी असून ते पूनावाला फिनकॉर्प या कंपनीचेही अध्यक्ष आहेत. त्यांनी कंपनीसाठी या वाणिज्यिक (कमर्शिअल) इमारतीचा खरेदी व्यवहार नुकताच पूर्ण केला आहे. AP 81 या टॉवरमधील 13 मजले अदर पूनावाला यांनी खरेदी केले आहेत. 19 मजल्यापैकी 13 मजले पूनावाला यांनी खरेदी केले आहेत. यापूर्वी कंपनीने याच इमारतीतील पहिला व दुसरा मजला खरेदी केला होता. नुकत्याच झालेल्या खरेदीमुळे या टॉवरची एक पूर्ण विंग पूनावाला यांच्या मालकीची झाली आहे. N Main Rd इथं AP 81 हा टॉवर उभारलेला आहे.

हेही वाचा: खडसेंना झटका; ED ने दाखल केलं आरोपपत्र, पत्नी-जावयाचाही समावेश

2019 मध्ये प्रिस्टीन प्रॉपर्टीजने येथे 150 कोटींचा व्यवहार करत 5 एकर जागा खरेदी केली होती. त्यानंतर 19 मजली टॉवर उभारला होता. या टॉवरमधील 60 टक्के भाग पूनावाला यांच्याकडे आहे. उर्वरित भागात फूट कार्पेट ऑफिस एरिया, कार आणि बाईकसाठी राखीव पार्किंग आहे. कोरोना संकटामध्ये पूनावाला यांच्या सीरमने देशातील पहिली लस तयार केली होती. त्यामुळे सीरम इंस्टीट्यूट हे नाव जभभरात पोहोचले आहे.

loading image
go to top