esakal | मुंबईत दिवाळीमध्ये फटाके फोडले, नियमभंगाच्या 40 प्रकरणांची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत दिवाळीमध्ये फटाके फोडले, नियमभंगाच्या 40 प्रकरणांची नोंद

वाढत्या प्रदुषणामुळे कोरोना वाढण्याचा धोका असून त्यामुळे देशातील विविध राज्यातील फटाक्यांवर बंदी घातली आहे. मुंबई महापालिकेनं फटाके बंदीचा निर्णय घेतला होता. त्यापार्श्वभूमीवर फटाके विक्रेते आणि फटाके फोडणारे यांचे विरोधात कारवाई करण्यात आली  मुंबई पोलिसांनी 40 प्रकरणांची नोंद केली आहे.

मुंबईत दिवाळीमध्ये फटाके फोडले, नियमभंगाच्या 40 प्रकरणांची नोंद

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई: वाढत्या प्रदुषणामुळे कोरोना वाढण्याचा धोका असून त्यामुळे देशातील विविध राज्यातील फटाक्यांवर बंदी घातली आहे. मुंबई महापालिकेनं फटाके बंदीचा निर्णय घेतला होता. त्यापार्श्वभूमीवर फटाके विक्रेते आणि फटाके फोडणारे यांचे विरोधात कारवाई करण्यात आली  मुंबई पोलिसांनी 40 प्रकरणांची नोंद केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं दिवाळीसंदर्भात नवी नियमावली जाहीर केली होती. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी मोठे फटाके फोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच फटाके फोडण्यास महापालिकेनं परवानगी दिली होती. 13 ते 17 नोव्हेंबर दरम्यान मुंबई मध्ये फटाके विक्रेते आणि फटाके फोडणारे यांचे विरोधात  कारवाई करण्यात करण्यात आली. त्यात भा.दं.वि. अंतर्गत एकूण  21 गुन्हे आणि विशेष स्थानिक कायदा अंतर्गत 19 गुन्हे दाखल करण्यात आले.

असे होते महापालिकेचे नियम

कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिक आणि खासगी परिसरात कोणत्याही प्रकारचे फटाके फोडण्यास बंदी करण्यात आली होती. फक्त 14 नोव्हेंबरला लक्ष्मी पुजनला इमारतींच्या अथवा घरांच्या आवारात फुलबाजे आणि पाऊस (अनार)अशा स्वरुपाच्या फटाक्याची आताषबाजी करण्याची परवानगी महानगर पालिकेने दिली होती.  या काळात घरा बाहेरुन आल्यावर हात, पाय, तोंड स्वच्छ करुनच घरात प्रवेश करावा. यासाठी साबण पाण्याचा वापर करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहनही करण्यात आलं होतं.

अधिक वाचा- त्रीपूलाला दोन वर्षापासून तारीख पे तारीख; कल्याण-डोंबिवलीकरांचा अपेक्षाभंग

हॉटेल्स, क्लब, जिमखाना, संस्था, व्यावसायिक परिसर अशा ठिकाणीही फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली होती. फटाक्यांची आतषबाजी आणि त्यासंबंधीचे कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन करता येणार नाही. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर महापालिकेकडून तसेच फौजदारी कारवाई येईल असे महानगर पालिकेने स्पष्ट केलं होतं. साथ रोग नियंत्रण कायदा 1897 ,आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि इतर काही कायद्यां अंतर्गत या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं पालिकेनं यापूर्वी स्पष्ट केलं होतं.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Firecrackers explode in Mumbai on Diwali 40 cases of violation registered

loading image
go to top