नवी मुंबईत फटाक्‍यांची ध्वनी तीव्रतेची चाचणी

 firework
fireworksakal media

सानपाडा : ध्वनिप्रदूषणाच्या (noise pollution) अंमलबजवणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने नुकतीच बेलापूर (belapur) येथे नवी मुंबई महापालिका (Navi mumbai municipal) क्षेत्रातील बाजारपेठेत उपलब्ध विविध प्रकारच्या फटाक्यांच्या ध्वनी (Fireworks noise test) तीव्रतेची चाचणी केली.

 firework
मुंबईत आज कोरोनाच्या 408 नव्या रुग्णांची भर; 6 जणांचा मृत्यू

ध्वनि प्रदूषणाच्या प्रभावी अंमलबजवणीसाठी नागरी प्रभागाचे रहिवासी, व्यापारी, औद्योगिक व शांतता प्रवण क्षेत्रात वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने सीबीडी बेलापूर सेक्टर १२ येथील सांडपाणी प्रक्रिया सयंत्रणा परिसरातील मैदानात फटाक्‍यांची चाचणी घेत फटाक्यांच्या ध्वनिची तीव्रता मोजली. यात उत्पादक मे.सुप्रिम प्यारो टेक्निक्स शिवकाशी, मे.इंडियन नेहमाल फायर वर्क्स, मे.मल्टी फार परोल्स वर्क्स, मे.बिग फार वर्क्स, मे.सोनिया फार वर्क्स शिवकाशी, मे.मालती फार वर्क्स प्यारोला, मे.एसआर आय एस, मे.मदर्स या कंपन्यांनी उत्पादित केलेले फटाके चाचणीसाठी वापरण्यात आले. यातील काही फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता विहित मर्यादेत आढळून आली तर फटक्यांच्या (५०, १२०, १००० आणि १००००) माळींच्या आवाजाची तीव्रता निश्‍चित मर्यादेपेक्षा जास्‍त आढळली.

या चाचणीचा अहवाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आल्‍याची असल्याची माहिती प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डी. बी. पाटील यांनी दिली आहे. सदर चाचणी दरम्यान नवी मुंबई पोलिस विभागाचे उपनिरीक्षक नीलेशकुमार जगताप, नवी मुंबई महापालिकेचे दीपक नगराळे, राज पाष्टे, कर्मवीर भाउराव पाटील महविद्यालयाचे यांचे प्रतींनिधी, हिराली फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता खानचंदानी, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नवी मुंबई व रायगड कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी डी.बी. पाटील, विद्यासागर किल्लेदार, व उपप्रादेशिक अधिकारी जयंत कदम, सचिन अडकर व क्षेत्र अधिकारी नीलेश पाटील, सचिन देसाई, उमेश जाधव, अजित देशमुख आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com