

Thane Double Decker Bus
ESakal
ठाणे : मुंबईप्रमाणे ठाण्यातील रस्त्यावर डबल डेकर बसमधून ठाणेकरांना प्रवास करता यावा, यासाठी पहिली एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस ठाणे परिवहनच्या ताफ्यात दाखल झाली होती. मात्र, चार्जिंगच्या सुविधेअभावी व तांत्रिक कारणांमुळे अनेक दिवस ही बस आगारातच उभी होती. अखेर आवश्यक तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर ही बस ठाण्याच्या रस्त्यांवर धावू लागली असून, प्रवाशांकडूनही तिला प्रतिसाद मिळत आहे.