CBSE ssc exam
Esakal
मुंबई : महापालिकेच्या शैक्षणिक प्रवासात यंदाचे वर्ष विशेष महत्त्वाचे ठरणार आहे. सीबीएसई मंडळाशी संलग्न असलेल्या पालिकेच्या १८ शाळांपैकी १० शाळांमधील पहिलीच तुकडी यंदा दहावीच्या परीक्षेला सामोरे जात आहे. एकूण ३६६ विद्यार्थी या ऐतिहासिक परीक्षेत सहभागी होत असून, पालिकेच्या शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता आणि क्षमता अधोरेखित होणार आहे.