

Grocery store facility launched at Mumbai suburban railway stations under Indian Railways initiative.
esakal
-नितीन बिनेकर
मुंबई : मुंबईची लोकल… गर्दीने भरलेली, प्रत्येकाच्या दिवसाला दिशा देणारी आणि लाखो आयुष्यांना रोज पुढे नेणारी. या लोकलच्या प्रवासात अनेकांच्या दिवसाची सुरुवात होते आणि शेवटही. मात्र, या धावपळीत किराणा खरेदीसाठी वेळ काढणे अनेकदा शक्य होत नाही. आता हीच कसर भरून काढण्यासाठी लोकल स्थानकांवर प्रथमच किराणा दुकानांची सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्रवासातच दैनंदिन खरेदी करण्याचा नवा पर्याय मुंबईकरांसमोर उपलब्ध होणार आहे.भारतीय रेल्वेच्या जाळ्यातील हा एक वेगळा आणि पहिलाच प्रयोग असणार आहे.