esakal | तीन महिन्यानंतर प्रथमच मध्य रेल्वे घेणार मेगाब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक...
sakal

बोलून बातमी शोधा

megablock

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेत तीन महिन्यांपासून लाॅकडाऊन असल्याने मध्य रेल्वेने पावसाळ्यापूर्वीचे संपूर्ण नियोजन केले आहे. सुरुवातील 30 जूनपर्यंत नियमित रेल्वे सेवा बंदची घोषणा असतांना आता ती वाढवण्यात आली असून अत्यावश्यक सेवेतील फेऱ्या वगळता 12 ऑगस्टपर्यंत रेल्वेची नियमित प्रवासी बंद राहणार आहे.

तीन महिन्यानंतर प्रथमच मध्य रेल्वे घेणार मेगाब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेत तीन महिन्यांपासून लाॅकडाऊन असल्याने मध्य रेल्वेने पावसाळ्यापूर्वीचे संपूर्ण नियोजन केले आहे. सुरुवातील 30 जूनपर्यंत नियमित रेल्वे सेवा बंदची घोषणा असतांना आता ती वाढवण्यात आली असून अत्यावश्यक सेवेतील फेऱ्या वगळता 12 ऑगस्टपर्यंत रेल्वेची नियमित प्रवासी बंद राहणार आहे. दरम्यान, आता तब्बल तीन महिन्यानंतर रविवारी उपनगरीय भागात मध्य रेल्वेने पहिल्या मेगाब्लॉक घोषणा केली असून, अभियांत्रिकी आणि देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. 

या वर्षातील सर्वात मोठं प्रॉपर्टी डिल, दोन अपार्टमेंटसाठी मोजले तब्बल 136 कोटी रुपये 

असा असेल मेगाब्लाॉक

मुख्य मार्ग 
कुठे : अप व डाउन जलद मार्गावर विद्याविहार - मुलुंड 
कधी : सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 पर्यंत
परिणाम : सकाळी 10.16 ते दुपारी 2.17 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन जलद विशेष लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि निर्धारित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. दुपारी 12.41 ते दुपारी 3.25 या वेळेत ठाणे येथून सुटणाऱ्या जलद विशेष लोकल मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येऊन निर्धारित थांब्यांवर थांबविण्यात येतील आणि माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. काही ठाणे व कल्याण लोकल रद्द केल्या जातील. परंतु राज्य शासनाने निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी पुरेशा सेवा चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधी दरम्यान मेल, एक्स्प्रेस गाड्या ठाणे ते विद्याविहार दरम्यान 5व्या व 6व्या मार्गावर वळविण्यात येतील.

हात दिला की खांद्यावर बसायचं ! पनवेलमध्ये बारचालक आता काय करतायत वाचा...

हार्बर लाइन 
कुठे
: पनवेल- वाशी दरम्यान अप व डाऊन हार्बर मार्गावर 
कधी : सकाळी 11.05 ते संध्याकाळी 4.05
परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.00 पर्यंत पनवेलला जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध होणार नाहीत. पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणारी हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 11.15 ते दुपारी 4.00  वाजेपर्यंत उपलब्ध होणार नाही. तथापि, ब्लॉक कालावधीत विशेष लोकल गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - मानखुर्द- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या विभागात धावतील.

loading image
go to top