या वर्षातील सर्वात मोठं प्रॉपर्टी डिल, दोन अपार्टमेंटसाठी मोजले तब्बल 136 कोटी रुपये 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

8 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्यूटी, स्टॅम्प ड्युटीच्या किमतीत प्रभादेवी भागात येतील ३ फ्लॅट्स..

मुंबई : लॉकडाऊनमुळे रिअल इस्टेट मार्केटला मोठा आर्थिक फटका बसला आहे. मात्र या काळात घर खरेदी क्षेत्रात मोठ्या डिलही सुरुच आहे. मंबईच्या प्रभादेवी भागात दोन डुप्लेक्स अपार्टमेंटसाठी तब्बल 136.27 कोटी रुपये मोजले गेलेत. 2020 या वर्षातील मुंबईतील प्रॉपर्टी व्यवसायातील हे सर्वात मोठं डील मानली जाते.

विराज प्रोफाईल लिमीटेड या कंपनीचे मालक निरज कोचर आणि कनिका कोचर यांनी हा सौदा केला आहे. या दाम्पत्याने प्रभादेवी परिसरात एका बिल्डीगमध्ये चार माळ्यावर पसरलेले दोन डुप्लेक्स अपार्टंमेट तब्बल 136 कोटी रुपये मोजून खरेदी केलेत. गंमतीचा भाग म्हणजे या फ्लँट खरेदीसाठी लागलेल्या स्टॅम्प ड्युटीच्या रक्कमेत प्रभादेवी भागात 3 बीएचके फ्लॅट सहज खरेदी करता येऊ शकतो.

मुंबईत कोरोना संक्रमणाची बाधा आणि प्रसाराचीही होणार उकल, आणखी १० हजार व्यक्तींवर होणार 'हे' सर्वेक्षण..
 

यापुर्वीचे टॉप प्रॉपर्टी डिल  : -

  • 2018 मध्ये उदयोगपती निरज बजाज यांनी वरळीमध्ये 120 कोटींना अपार्टमेंट खरेदी केलं होतं 
  • 2019 मध्ये गोदरेज प्रॉपर्टी लिमीटेडने आर के स्टुडीओची जागा 250 कोटीला खरेदी केली होती
  • 2019 मध्येच गायक अरिजीत सिंह याने वर्सोवा भागात 9.1 कोटीमध्ये एक घर खरेदी केलं होतं

कोचर हे स्टेनलेस स्टिल व्यवसायातील आघाडीचे नाव आहे. मार्च महिन्यात त्यांनी प्रभादेवी परिसरातील एका इमारतीत 46, 4, 48 आणि 49 या माळ्यावर दोन डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केलेत. लॉकडाऊन सुरु होण्यापुर्वी म्हणजे 16 मार्चला ही खरेदी प्रक्रीया पुर्ण झाली. 

मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये दिसून येतंय 'हे' नवीन लक्षण, डॉक्टर्स देखील झालेत हैराण...

या इमारतीत 46, 47 माऴ्यावरची डुप्लेक्स अपार्टमेंट निरज कोचर तर 48, 49 व्या माळ्यावरची डुप्लेक्स अपार्टमेंट कनिका कोचर यांच्यावर नावावर आहे. एका अपार्टमेंटचे क्षेत्रफळ 10,502 चौरस फुटाचे असून, दोन अपार्टमेंट्सचे एकुण क्षेत्रफळ 21,004 चौरस फुट एवढे आहे. हे फ्लॅट खरेदीसाठी  8.17 कोटी रुपये एवढी स्टॅम्प ड्यूटी भरावी लागली आहे. कोचर परिवाराला 16 कारसाठी पार्कींग जागा मिळाली आहे. हा फ्लॅट प्रति चौरस फुट 64,879 रुपये या किमंतीला मिळाला आहे.

this years biggest property deal chochar family spent 136 crore for two flats 


    स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
    Web Title: this years biggest property deal chochar family spent 136 crore for two flats