मुंबईतील पहिली प्लाझ्मा बँक KEM मध्ये, नायर आणि सायन रुग्णालयांमध्येही प्रस्ताव 

मुंबईतील पहिली प्लाझ्मा बँक KEM मध्ये, नायर आणि सायन रुग्णालयांमध्येही प्रस्ताव 
Updated on

मुंबई : कोरोनाबाधित गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी बर्‍याच ठिकाणी सध्या प्लाझ्मा थेरपी वापरली जात आहे. त्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा अशा रुग्णांचा जीव वाचवू शकतो. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीनंतर मुंबईतील पालिकेच्या केईएम रुग्णालयात लवकरच प्लाझ्मा बँक सुरू केली जाणार आहे. प्लाझ्माची गरज असणाऱ्या रुग्णांना तो सहज उपलब्ध होण्यासाठी त्याची मदत होणार आहे.

प्लाझ्मा बँक सुरू करणारे पालिकेचे केईएम पहिले रुग्णालय ठरणार आहे. त्यापाठोपाठ नायर आणि सायन रुग्णालयातही अशी बँक सुरू केली जाणार आहे. दोन आठवड्यांत रुग्णालयात प्लाझ्मा बँक सुरू केली जाणार असल्याचे `केईएम`चे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी  सांगितले. 

महत्त्वाची बातमी : TRP घोटाळा प्रकरण : रिपब्लिकचे CFO आज चौकशीसाठी उपस्थित राहणार नाहीत

प्लाझ्मा संकलित करून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणार 

एका संस्थेमार्फत प्रत्येक परिसरातून प्लाझ्मा दान करण्यासाठी दाते शोधले जाणार आहेत. त्याच संस्थेतर्फे जनजागृतीही केली जाणार आहे. संस्थेतील कर्मचारी प्लाझ्मा दानासाठी दात्यांशी संपर्कही करणार आहेत. त्याप्रमाणे दान करण्यासाठी जे योग्य असतील अशांकडून त्यांचा प्लाझ्मा घेतला जाईल. तो काही काळासाठी संकलित करून ठेवला जाईल. कोरोनाचा प्रादुर्भाव किती काळ टिकेल याबाबत निश्चिती नसल्याने प्लाझ्मा किमान एक वर्ष संकलित करून ठेवता येण्यासाठी बँक महत्त्वाची भूमिका बजावेल.

सौम्य आणि मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णांना गरज लागेल तसा प्लाझ्मा दिला जाईल. रेमडेसिवीर आणि टोसिलिझुमॅब औषधांच्या किमतीच्या तुलनेत प्लाझ्माची साठवणूक करणे कमी खर्चिक आहे. शिवाय, केईएममध्ये ट्रान्सफ्युझन मेडिसीन विभाग असल्याने तिथे प्लाझ्मा बँक सुरू करणे सोयीस्कर ठरेल, अशी माहिती डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली. 

प्लाझ्मा बँकसंदर्भातील झालेल्या बैठकीत त्याबाबतचा प्रस्तावही सादर झाल्याचे महापालिका रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक व नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी स्पष्ट केले. 

याबाबत KEM चे डीन डॉक्टर हेमंत देशमुख म्हणालेत की, इतर ठिकाणी प्लाझ्मा बँक सुरू करण्यासाठी एफडीएची परवानगी लागू शकते. शुक्रवारी तिन्ही पालिका प्रमुख रुग्णालयांच्या अधिष्ठातांची त्याबाबत बैठक झाली. दोन आठवड्यांनी प्लाझ्मा बँक सुरू होईल. त्याबाबतचा प्रस्तावही सादर झाला आहे. 

तर मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) सुरेश काकाणी म्हणालेत की, 
मुंबईतील रुग्णालयात प्लाझ्मा बँक सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यावर एक ते दोन आठवड्यांत निर्णय होणार आहे. जे रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत त्यांनाही पालिकेकडून संपर्क केला जात आहे. त्यांना प्लाझ्मा दान करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. 

first plasma bank starts in KEM hospital of mumbai BMC is proposing few more in nair and sion hospital

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Monsoon Clouds Arabian Sea mumbai kerala goa karnataka maharashtra rain
Pune Toxic Liquor Tragedy Highlights Staff Shortage in Excise Department
Rural Road Network Set for Expansion as Cabinet Clears 6,429 Crore Infrastructure Plan
₹36,585 Crore Farm Loan Waiver Gets Green Signal; Know the Terms and Eligibility
Marathi News Esakal
www.esakal.com