अत्यंत महत्त्वाचं :: सावधान ! 'ही' आहेत कोरोनाची नवी ६ लक्षणं... 

अत्यंत महत्त्वाचं :: सावधान ! 'ही' आहेत कोरोनाची नवी ६ लक्षणं... 

मुंबई: कोरोना व्हायरसनं  जगभरात हाहाकार माजवला आहे. भारतातही या व्हायरसचा तब्बल २७ हजार पेक्षा जास्त लोकांना संसर्ग झाला आहे. दिवसेंदिवस या संख्येत वाढ होत चालली आहे. अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना कोरोनाचा संसर्ग होऊनही लक्षणं दिसत नाहीये. त्यामुळे डॉक्टर चिंता व्यक्त करत आहेत. मात्र आता या कोरोनाच्या लक्षणांमध्ये आणखी ६ लक्षणांची वाढ झाली आहे.

आतापर्यंत सर्दी, ताप, खोकला,श्वास घेण्यासा त्रास होणं अशी काही कोरोनाची लक्षणं दिसून येत होती. मात्र आता अमेरिकेच्या राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संस्था असलेल्या सेंटर फॉर डिझीस कंट्रोल अँड प्रिवेंशननं (सीडीसी) कोरोनाची सहा नवीन लक्षणं शोधून काढली आहेत. काही दिवसांआधी लहान मुलांचे पाय सुजणं हेही कोरोनाचं नवीन लक्षणं डॉक्टरांना आढळलं होतं.

अधूनमधून थंडी वाजून येणे, स्नायू दुखणे, डोकेदुखी, घसा खवखवणे, चव कमी होणे आणि वास येणे अशी लक्षणं कोरोना व्हायरसची असू शकतात असा दावा सीडीसीनं केला आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्याच्या २ ते १४ दिवसांनंतर ही लक्षणं दिसून येतात असंही सीडीसीनं स्पष्ट केलं आहे.

श्वास घेताना त्रास होत असेल,छातीत सतत वेदना होतअसतील , छातीत दबाव जाणवत असेल किंवा ओठ आणि चेहरा निळसर पडला असेल किंवा यासंबंधित लक्षणं जाणवायला लागली तर जवळच्या आरोग्य यंत्रणेत जाऊन योग्य ती तपासणी करुन घ्या असा खबरदारीचा इशारा सीडीसीकडून देण्यात आलाय.

त्यामुळे जुन्या लक्षणांबरोबरच या नवीन लक्षणांकडेही लक्ष देणं आणि अशी लक्षणं आढळली तर जवळच्या रुग्णालयात जाऊन योग्य ती तपासणी करून घेणं आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे.

beware of these symptoms these symptoms are new symptoms of covid19  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com