ग्रीन फटाक्यांतही आढळलेत धोकादायक केमिकल्स, लहान मुलांपासून असे फटाके दूरच ठेवा

ग्रीन फटाक्यांतही आढळलेत धोकादायक केमिकल्स, लहान मुलांपासून असे फटाके दूरच ठेवा

मुंबई, 12: मुंबईतील ग्रीन फटाक्यांतही धोकादायक केमिकल्स असल्याचा अहवाल आवाज फाउंडेशनने दिला आहे. आवाज फाऊंडेशनने मुंबईतल्या मार्केटमधील फटाक्यांच्या केलेल्या चाचणीत आरोग्यासाठी धोकादायक अशा केमिकल्सचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळेच या फटाक्यांवर बंदी आणावी अशी मागणी आवाज फाउंडेशनकडून करण्यात आली आहे. 

एकुण 28 फटाक्यांची चाचणी आवज फाऊंडेशनमार्फत चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये ग्रीन फटाक्यांमध्येही या धोकादायक केमिकल्सचा वापर झाल्याचे आढळले आहे. म्हणूनच मुंबईत या फटाक्यांवर बंदी आणावी अशी मागणी करणारे पत्र आवाज फाऊंडेशनने मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. 

रहिवाशी भागांमध्ये वापरासाठी मंजुर करण्यात आलेले ग्रीन फटाक्यांमधील चक्री, पाऊस आणि सूरसुरीची चाचणी आवाज फाउंडेशनमार्फत करण्यात आली. मुंबई महापालिकेने जारी केलेल्या निर्देशानुसार, लहान मुलांकडून या फटाक्यांचा वापर होतो. महत्वाचे म्हणजे ग्रीन फटाक्यांवर नीरीचा स्टॅम्प आहे. या ग्रीन फटाक्यांमध्ये बॅरिअमचा वापर होत नाही, म्हणून नीरीचा स्टॅम्प केला जातो. पण बॅरिअम नायट्रेटचा वापर या ग्रीन फटाक्यांमध्येही आढळलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या बॅरिअम नायट्रेटचा वापर ऑक्टोबर 2018 मध्ये बंद केला होता. त्यासोबतच नायट्रेट आणि सल्फरचा वापरदेखील यामध्ये आढळला आहे. 

मुलांसाठी हानीकारक असणाऱ्या केमिकल्सचाच वापर हा ग्रीन फटाक्यांमध्ये झालेला आहे हे या चाचण्यांमध्ये आढळले आहे. पण त्याहून धोकादायक गोष्ट म्हणजे बंदी असूनही या गोष्टींचा उल्लेख फटाक्यांच्या पॅकेजिंगवर आहे. या फटाक्यांमुळे कोविडच्या काळातला धोका आणखी वाढू शकतो. त्यामध्ये श्वसनाच्या विकाराचा मोठा संभाव्य धोका आहे. दरवर्षी आवाज फाऊंडेशनसोबत होणारी संयुक्त चाचणीही यंदा एनवेळी रद्द करण्यात आली. त्यानंतर एमबीपीसीने स्वतंत्र अशी चाचणी केली. 

फटाक्यांचे वितरण आणि विक्री करणाऱ्या दुकानांना परवाना घेण्याचा आदेश मुंबई महापालिकेकडून देण्यात आला आहे. पण अनेक ठिकाणी फटाक्यांची विनापरवाना विक्री सुरू आहे, असे आढळले आहे. त्यामुळे अनेक विक्रेते आणि वितरकांकडून मुंबई महापालिकेच्या आदेशाचा भंग होत असल्याचे समोर आले आहे. म्हणूनच मुंबई पोलिस आणि महापालिकेने अशा खुलेआम विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांचा शोध घ्यावा अशी मागणी आवाज फाउंडेशनने मुख्यमंत्र्यांना केली आहे.

( संपादन - सुमित बागुल )

even green firecrackers found poisonous elements keep these firecrackers away from kids

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com