esakal | महाडमध्ये पहिल्यांदाच आले स्थलांतरित पाहुणे, सावित्री नदीत विहार
sakal

बोलून बातमी शोधा

फ्लेमिंगो

महाडमधील पक्षीप्रेमींसाठी फ्लेमिंगोसारखा सुंदर पक्षी स्थलांतरित होणे ही एक पर्वणीच आहे; परंतु बदलते हवामान आणि निसर्गातील घडामोडी यांचा विपरीत परिणाम या पक्ष्यांच्या स्थलांतरित थांब्यावर होत आहे, ही चिंतेची बाब असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. 

महाडमध्ये पहिल्यांदाच आले स्थलांतरित पाहुणे, सावित्री नदीत विहार

sakal_logo
By
सुनील पाटकर

मुंबई- उरण, मुंबई येथील खाड्यांमध्ये हमखास दिसणारा रोहित (फ्लेमिंगो) पक्षी रायगड जिल्ह्यातील महाडजवळील सावित्री नदीत पक्षिमित्रांना दिसला. फ्लेमिंगोच्या या पहिल्याच दर्शनामुळे पक्षिमित्रांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. 

जितेंद्र आव्हाड यांची सूचना तरी ऐका, भाजपची मागणी

या आठवड्यात तीन फ्लेमिंगो काही काळ महाडजवळ सावित्री नदीत थांबले आणि वीरच्या खाजणी कांदळवनात काहीतरी शोधून पेणच्या दिशेने रवाना झाल्याचे वन्यजीव पक्षी अभ्यासक रूपेश वनारसे यांनी सांगितले. पक्षी अभ्यासकांसाठी ही नोंद घेण्याची बाब आहे. गेल्या 25 वर्षांच्या पक्षी निरीक्षणात इथल्या अभ्यासकांच्या नोंदणीत फ्लेमिंगोचे हे पहिलेच दर्शन. खाडीतील फ्लेमिंगो हा स्थलांतरित पक्षी मुंबईच्या पक्षीगणातील मानबिंदू आहे. ठाणे, शिवडी, उरण आणि अगदी अलिबाग, पेणपर्यंत तो सर्वत्र दिसतो. वडखळ फाट्यावरील नवीन उड्डाणपुलावर थांबलो की पश्‍चिमेकडील पाणथळात त्यांचे तुरळक थवे नजरेस पडतात. गेल्या 11 वर्षांमध्ये या हिवाळी स्थलांतरित पक्ष्याने मुंबई ते पेण इथल्या खाजणी भागावर नवीन जागा शोधण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

अपुरी जागा, वाढते प्रदूषण आणि कांदळवनावरील नवनवीन प्रकल्प यामुळे तळकोकणाकडे परीक्षण करण्याकरिता पक्षी थेट बाणकोट खाडीच्या उगमाकडे म्हणजेच महाडकडे आलेले असावेत. शिवाय अतिवृष्टी, अवर्षण आणि तापमान बदलाचे नैसर्गिक वादळ यामुळे त्यांच्या स्थलांतराच्या बाबतीत बदल घडवून आल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. महाडमधील पक्षीप्रेमींसाठी फ्लेमिंगोसारखा सुंदर पक्षी स्थलांतरित होणे ही एक पर्वणीच आहे; परंतु बदलते हवामान आणि निसर्गातील घडामोडी यांचा विपरीत परिणाम या पक्ष्यांच्या स्थलांतरित थांब्यावर होत आहे, ही चिंतेची बाब असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. 

कोस्टल ऑब्झर्व्हेशन अँड सीबर्ड सर्व्हे टीमही अमेरिकेतील संस्था गेली पंधरा वर्षे अलास्काच्या समुद्री तटांवर तसेच प्रवाळ बेटांवर पेलाजीक बर्डस्‌ पक्षी प्रजातींवर अभ्यास करीत आहे. यामध्ये पफिन्स, मूर्रस्‌ आणि पापलेट्‌स पक्षी प्रजातींच्या मृत्युदरातील वाढीवर त्यांनी धक्कादायक निष्कर्ष काढले. हजारो पक्ष्यांची घरटी बनविण्यासाठीच्या जागा म्हणजे प्रवाळ बेटेजर संपुष्टात आली तर हा पक्षी वर्ग लवकरच नामशेष होईल. गेल्या पाच वर्षांत या पक्षी वर्गातील मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. आपल्याकडे फ्लेमिंगोचे असे अचानक येणे हे नक्कीच या सर्व घटनाक्रमांवर गांभीर्याने प्रकाश टाकणारे आहे. 
- प्रेमसागर मेस्त्री, पक्षी अभ्यासक, सीस्केप संस्था

(संपादन- बापू सावंत) 
 

loading image