मुंबईत कोरोना रूग्ण दुपटीचा कालावधी पहिल्यांदाच 102 दिवसांवर

मिलिंद तांबे
Thursday, 22 October 2020

काल रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने पहिल्यांदाच तब्बल 102 दिवसांचा टप्पा गाठत शतक पार केले आहे. मुंबईत बुधवारी 1,609 रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,45,871 झाली आहे.

मुंबई : कोरोनानं सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. मुंबईत कोरोनानं थैमान घातलं आहे. अशातच मुंबईतून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका क्षेत्रात रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने अर्धशतक पार केले होते. काल रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने पहिल्यांदाच तब्बल 102 दिवसांचा टप्पा गाठत शतक पार केले आहे. 

मुंबईत बुधवारी 1,609 रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,45,871 झाली आहे. मुंबईत काल 48 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 9,869 वर पोहोचला आहे. मुंबईत काल 894 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2,15,269 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 88 टक्के इतका झाला आहे.

मुंबई महापालिकेची कोविडबाबत मिशन झिरोकडे वाटचाल सुरु आहे. मुंबई पालिका क्षेत्रातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा 25 ऑगस्ट 2020 ला 93 दिवस इतका झाला होता.  संसर्गाचे प्रमाण वाढल्याने हा कालावधी काही प्रमाणात कमी होत 14 सप्टेंबर 2020  ला 54  दिवस इतका नोंदविण्यात आला होता. रुग्ण दुपटीचा कालावधी 1 ऑक्टोबरला 66 दिवस, 10 ऑक्टोबरला 69 दिवस आणि 21 ऑक्टोबरला 102  दिवस एवढा नोंदविण्यात आला आहे. 

अधिक वाचाः  अॅक्सिस बँकेतून नाही तर HDFC बँकेतून होणार मुंबई पोलिसांचा पगार

कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 7,511 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. त्यामुळे कोविड कोळजी केंद्रात दाखल करण्यात येणा-यांची संख्या देखील वाढत असून काल कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 867 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुंबईत 630 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 9,255 इतकी आहे. 

मुंबईत काल नोंद झालेल्या 48 मृत्यूंपैकी 34 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 33 पुरुष तर 15 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 48 रुग्णांपैकी दोघांचे वय 40 च्या खाली होते. 10 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते तर 36 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते. 
             
काल 894 रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत 2,15,269 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 102 दिवसांवर गेला आहे. तर 20 ऑक्टोबर पर्यंत एकूण 13,90,891  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 14 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.69 इतका आहे.

---------------------------

(संपादनः पूजा विचारे)

First time Mumbai duration of corona patients is 102 days


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First time Mumbai duration of corona patients is 102 days