Voter Slip : मतदार यादीत नाव शोधण्यापासून सुटका ; पहिल्यांदाच स्मार्ट व्होटर स्लिप उपक्रम

देशभरात लोकसभा निवडणुकीचा उत्सव सुरू आहे. यात मतदान करण्यासाठी जाताना मतदारांना पूर्वी मतदार यादीत नाव शोधण्यासाठी खूप वेळ जात होता; परंतु आता मुंबईकरांना मतदार यादीत नावाची शोधाशोध करावी लागणार नाही.
Voter Slip
Voter Slipsakal

मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीचा उत्सव सुरू आहे. यात मतदान करण्यासाठी जाताना मतदारांना पूर्वी मतदार यादीत नाव शोधण्यासाठी खूप वेळ जात होता; परंतु आता मुंबईकरांना मतदार यादीत नावाची शोधाशोध करावी लागणार नाही. कारण यंदाच्या निवडणुकीत क्यूआर कोड स्कॅन करून माहिती मिळवता येणार आहे. मुंबईत महत्त्वाच्या ठिकाणी क्यूआर कोड लागणार आहेत, अशी माहिती मुंबई शहराचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.

मुंबईत पहिल्यांदा या निवडणुकीत डिजिटल उपक्रम राबविला जाणार आहे. यासाठी स्मार्ट व्होटर स्लिप तयार करण्यात आली आहे. मुंबई शहरात विविध सार्वजनिक ठिकाणी बारकोड लावण्यात आले आहेत. यामुळे मतदारांना त्यांच्या स्मार्टफोनवर तो कोड स्कॅन केल्यानंतर मतदाराचे नाव, मतदान केंद्राचा तपशील (पत्ता आणि बूथ क्रमांकासह) आणि निवडणुकीची तारीख आणि वेळ यांसारखा तपशील मिळणार आहे. यापूर्वी मतदान केंद्राबाहेर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मतदार यादीत नाव शोधून देण्यास मदत करत असत.

एकाच वेळी अधिक प्रमाणात मतदार तेथे आल्यास त्याचा वेळ वाया जात होता. तसेच काही जणांना तर वेळेत मतदान केंद्र न मिळाल्याने ते मतदानापासून वंचित राहत होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत डिजिटल व्होटर स्लिप हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी सर्वात प्रथम मोबाईलवर डिजिटल व्होटर स्लिप डाऊनलोड केरावी लागणार आहे. या स्लिपच्या मदतीने मतदान प्रक्रियेत वाया जाणारा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी सांगितले.

Voter Slip
Lok Sabha Poll 2024 : काँग्रेससह भाजपचेही मतदान वाढल्याने चुरस; दोन्ही पक्षांकडून लीड मिळण्याचा दावा

मतदार स्लिप हे नोंदणीकृत मतदारांना निवडणुकीपूर्वी जारी केलेले असून त्यामध्ये सामान्यत: मतदाराचे नाव, मतदान केंद्राचा तपशील (पत्ता आणि बुथ क्रमांकासह) आणि निवडणुकीची तारीख आणि वेळ यासारखी माहिती असणार आहे.

कुठे लावणार क्यूआर कोड?

1 मुंबई शहरातील गर्दीच्या विविध ठिकाणी जसे की बस स्थानक, रेल्वे स्थानके, बाजारपेठा, व्यापारी क्षेत्रे अशा ठिकाणी बारकोड बसविण्यात येणार आहेत.

2 हा बारकोड स्कॅन केल्यानंतर मतदारांना मतदान यादीतील नाव शोधता येणार आहे.

सर्व वयोगटातील मोबाईल फोनवरील स्क्रीन टाइम वाढला आहे. लोकांना बारकोड स्कॅन करून दैनंदिन व्यवहार करण्याची सवय झाली आहे. त्याचाच वापर मतदार जागृतीसाठी केला जात आहे. मतदान करण्याची प्रक्रिया सोपी व्हावी, यासाठी क्यूआर कोड आधारित व्होटर स्लीप आणि सार्वजनिक ठिकाणी क्यूआर कोड लावले आहेत. यासोबत मोबाईलमधील डिजिटल व्होटर स्लिपमुळे मतदान प्रक्रियेदरम्यान प्रतीक्षा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे.

- संजय यादव, जिल्हाधिकारी

तथा जिल्हा निवडणूक ,अधिकारी, मुंबई शहर

उत्तर-पूर्व मुंबईमध्ये खर्च तपासणी सुरू

उत्तर-पूर्व मुंबई मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचार कालावधीतील खर्चाची तीन वेळेस तपासणी होणार आहे. त्यातील पहिली खर्च तपासणी गुरुवारी केंद्रीय खर्च निरीक्षक डॉ. सुनील यादव यांनी विक्रोळी येथील कार्यालयात केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com