

Navi Mumbai Urban Agriculture Center
ESakal
नवी मुंबई : उच्चदाब वीज वाहिन्यांच्या खालील जमिनींचा हरित क्षेत्रासाठी उपयोग करण्याचे सिडकोने स्वीकारलेले धोरण आता फलदायी ठरत आहे. त्यातून नवी मुंबईतील पहिले अर्बन अॅग्रीकल्चर सेंटर उभे राहिले आहे. २००८ मध्ये सिडकोने कोकण कृषी विकास प्रतिष्ठानला खारघर सेक्टर पाच येथील उत्सव चौकाजवळ नर्सरी व अॅग्रो माहिती केंद्रासाठी दिलेल्या भूखंडावर हा उपक्रम आकाराला आला आहे.