
नितीन बिनेकर
मुंबई : देशातील पहिली पर्यावरणपूरक आणि आधुनिक सुविधांनी सजलेली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आता मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्यास सज्ज झाली आहे. येत्या १ ऑगस्ट २०२५ पासून ही ई-वॉटर टॅक्सी गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीटी आणि डोमेस्टिक क्रूझ टर्मिनस ते जेएनपीटी या दोन जलमार्गांवर नियमितपणे धावणार आहे. या उपक्रमामुळे एकीकडे समुद्री वाहतुकीला चालना मिळणार असून, दुसरीकडे वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर उपाय म्हणून एक सकारात्मक पाऊल उचलले जात आहे.