esakal | मुंबई महापालिका प्रशासना विरोधात मासे विक्रेत्यांचा एल्गार!
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

मुंबई महापालिका प्रशासना विरोधात मासे विक्रेत्यांचा एल्गार!

sakal_logo
By
- समीर सुर्वे

मुंबई : फोर्ट येथील छत्रपती शिवाजी महाराज (CSMT) मंडईची इमारत धोकादायक असल्याने तळ मजल्यावरील मासे विक्रेत्यांना (Fish vendors) मुलुंड ऐरोलीसह (Mulund Airoli) ठिकठिकाणी स्थलांतरीत करण्यात येणार आहे. मात्र, येथील विक्रेत्यांनी आज महात्मा फुले मंडईच्या परीसरातच पुनर्वसन करण्याचा आग्रह धरत (Vendors Strike) महानगरपालिका (BMC) प्रशासना विरोधात शनिवारी आंदोलन केले. (Fish Vendors market shifting issue strike against BMC)

फलटण मार्गावरील मंडईची इमारत धोकादायक असल्याने काही वर्षांपुर्वी रिकामी करण्यात आली आहे.या इमारतीची वरील मजले पाडण्यात आले असून तळमजल्यावर घाऊक आणि किरकोळ मासळी बाजारअाहे.भाऊचा धक्का,ससून डॉक मधून येथे मासळी विक्रीसाठी आणले जाते.ही इमारत आता पुर्ण पाडायची असल्याने या विक्रेत्यांना मुलुंड ऐरोलीसह ठिकठिकाणी स्थालांतरीत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.तसेच,या विक्रेत्यांना 48 तासात जागा सोडण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे.

हेही वाचा: चांगली बातमी : दोन दिवसात तब्बल दहा हजार धारावीकरांना मिळणार मोफत लस!

उच्च न्यायालयाने याच आठवड्यत ही इमारत पाडण्याचे आदेश दिले आहेत.त्यानंतर पालिकेने 48 तासांची नोटीस पाठवली आहे. ऐरोली जकात नाका, अंधेरी मरोळ, फोर्ट मंडई, कुलाबा मंडई,नळबाजार व इतर ठिकाणी स्थालांतरीत करण्यात येणार आहे.मात्र,या कोळी महिलांचा विरोध आहे.फुलेे मंडईची दुरुस्ती सध्या सुरु आहे.यातील फळ विक्रेत्यांना पालिकेने मंडईच्या परीसरातच जागा दिली आहे.त्यामुळे मासे विक्रेत्यांचेही याच परीसरात पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात येत आहे.

भूमिपुत्र हद्दपार होतील

कोळीसमाज हा मुंबईचा आद्यनागरीक आहे. मात्र,महानगर पालिका या नागरिकांशी दुजाभाव करत आहे. असा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी केला. या भुखंडावर मॉल उभारुन कोट्यावधी रुपये कमवायचे असल्याने भूमिपुत्रांना हद्दपार करण्याचा डाव आहे असा आरोपही तांडेल यांनी केला.

loading image