एलईडीच्या प्रकाशात अवैध मासेमारी, मत्स्य विभागाचा छापा; ३० दिवे, जनरेटर नौका जप्त

Fisheries Department Action: एलईडी दिव्यांच्या प्रकाशाचा वापर करून अवैध मासेमारी सुरू असल्याचा प्रकार मत्स्य विभागाने उघडकीस आणला आहे.
Illegal fishing

Illegal fishing

ESakal

Updated on: 

अलिबाग : रायगडच्या सागरी क्षेत्रात अनधिकृत मासेमारीविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई केली. मांडवा समुद्रकिनारी पहाटेच्या अंधारात एलईडी दिवे आणि जनरेटरच्या सहाय्याने मासेमारीच्या तयारीत असलेली नौका गस्ती पथकाने पकडली. या कारवाईत नौकेसह ३० एलईडी दिवे आणि एक जनरेटर जप्त करण्यात आला.

Loading content, please wait...