
भाईंदर, ता. २१ (बातमीदार) : एमएमआरडीएच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या नियोजित उत्तन ते विरार या सागरी सेतूला उत्तनमधील मच्छीमार संघटनांकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे.
या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी एमएमआरडीएकडून उत्तन येथे मंगळवारी मच्छीमार संघटनांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकित विविध मुद्द्यांवर स्पष्टीकरण देण्याची मागणी करत मच्छीमारांनी या सेतूला विरोध असल्याचे अधिकाऱ्यांसमोर ठामपणे सांगितले.