esakal | Offline Exam: पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख ठरली
sakal

बोलून बातमी शोधा

Scholarship exam

Offline Exam: पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख ठरली

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई: मागील अनेक महिन्यांपासून पुढे ढकलण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची (Scholarship Exam) अखेर तारीख (date) जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा राज्यभरात 8ऑगस्ट रोजी ऑफलाईन पद्धतीने (Offline) घेतली जाणार आहे. ( Five And Eight class scholarship test declared as eight augast-nss91)

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला ही शिष्यवृत्ती घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले असून ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार असल्याची माहिती परिषदेकडून देण्यात आली. पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला यंदा राज्यभरातून 6 लाख 32 हजार 478 विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे.

हेही वाचा: देशमुखांनी CBI विरोधात केलेल्या याचिकेवर गुरुवारी निर्णय- HC

पाचवीच्या विद्यार्थ्यांची संख्या 3 लाख 88 हजार 335 तर आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या 2 लाख 44 हजार 143 इतकी आहे राज्यातील 47 हजार 462 शाळांमधील विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. तर परीक्षा घेण्यासाठी राज्यभरामध्ये 5 हजार 687 इतकी केंद्र आहेत. कारोनाची परिस्थिती लक्षात घेता कोरोना नियमांचे पालन करण्याच्या अटीवर शालेय शिक्षण विभागाने ही परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे. 8 ऑगस्ट रोजी ही परीक्षा घेण्याबाबत सूचना परीक्षा परिषदेला देण्यात आल्या आहेत.

loading image