
Dog Bite Dombivali : शर्मिला वाळुंज : कल्याण, डोंबिवलीमध्ये भटक्या श्वानांनी पुन्हा एकदा लहान मुलावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव रेतीबंदर परिसरातील बेबीबाई निवास येथे पाच भटक्या श्वानांनी चिमुकल्यावर हल्ला करत अक्षरश: ओढत त्याला गंभीर जखमी केले. मंगळवारी काल(ता.२४) सकाळी ही घटना घडली. श्वानांनी केलेल्या हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. हल्ला झालेला मुलगा हॉस्पिटलमधून घरी असून रुग्णालयातून त्याला डिस्चार्ज मिळाला आहे.