मुंबई : 598 निवासी डॉक्टरांना कोरोनाची बाधा | Mumbai corona update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

doctor corona infected
मुंबई : 598 निवासी डॉक्टरांना कोरोनाची बाधा

मुंबई : 598 निवासी डॉक्टरांना कोरोनाची बाधा

मुंबई : कोरोना संसर्ग (corona patients) वाढत असल्यामुळे मुंबईकरांना (Mumbai) वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बाधा होण्याचे प्रमाण वाढत आहे. पालिका तसेच खासगी रुग्णालयामध्ये डॉक्टरांना संसर्ग (Doctors corona infected) ही संख्या वाढत आहे. त्यातच 598 निवासी डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्याने आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढत चालला आहे. (five hundred and ninety eight doctors corona positive in mumbai)

हेही वाचा: मुंबईच्या बिल्डरकडे मागितली २ कोटींची खंडणी ; बंगळुरुत आरोपीला अटक

महाराष्ट्रात ओमायक्रॉनसह कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच आता राज्यातील 598 निवासी डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड कडून देण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रूग्णांच्या दैनंदिन आकडेवारीत वाढ होत आहे. राज्यातील जे. जे. रुग्णालय, नायर रुग्णालय, सायन, केईएम, ठाणे, धुळे, कुपर, पुण्यातील ससून रुग्णालय, मिरज, लातूर, औरंगाबाद आणि नागपूर येथील निवासी डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अशा परिस्थितीत काही रुग्णालयांमध्ये ओपीडी तसेच सर्जरी विभागातील सेवा, यासह इलेक्टिव्ह सर्जरीस टप्प्याटप्याने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्वाधिक बाधित डॉक्टरांची ही संख्या जेजे रुग्णालयात आहे त्याखालोखाल लोकमान्य टिळक सायन रुग्णालय, केईएममध्ये आणि नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा सहभाग आहे. अशी माहिती मार्डकडून देण्यात आली.

रुग्णालय बाधीत डॉक्टर

जेजे- 134

लातूर- 05

यवतमाळ- 04

धुळे- 08

मिरज- 02

एचबीटीएमसी आणि डॉ. आर एन कूपर हॉस्पिटल - 07

नागपूर- 06

जीएमसी औरंगाबाद- 04

केईएम मुंबई - 115

सायन- 122

ठाणे- 16

सोलापूर - 25

कोल्हापूर - 02

बीजेजीएमसी, पुणे - 18

नांदेड - 07

पिंपरी- 10

नायर - 110

अकोले- 01

अंबाजोगाई- 02

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top