मुंबईच्या बिल्डरकडे मागितली २ कोटींची खंडणी ; बंगळुरुत आरोपीला अटक | Mumbai crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

culprit arrested
मुंबईच्या बिल्डरकडे मागितली २ कोटींची खंडणी ; बंगळुरुत आरोपीला अटक

मुंबईच्या बिल्डरकडे मागितली २ कोटींची खंडणी ; बंगळुरुत आरोपीला अटक

मुंबई : येथील एका बिल्डरकडे ( Mumbai Builder) तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणीची (Extortion case) मागणी करण्याऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. महेश संजीव पुजारी (35) असं अटक (culprit arrested( केलेल्या आरोपीचं नाव आहे. मालाड पोलिसांनी (Malad police) खंडणी प्रकरणाची दखल घेत बुधवारी आरोपी पुजारीला कर्नाटकमध्ये (Karnatak) पकडलं आणि गुरुवारी त्याला मुंबईत आणलं. आरोपीच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. (Mumbai malad police arrested a culprit from Bangalore in two crore extortion case)

हेही वाचा: मुंबई : रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

याबाबत सविस्तर वृत्त असं की, " आरोपी पुजारीने मे २०२१ मध्ये बिल्डरला मोबाईल फोनच्या अॅपच्या माध्यमातून कॉल केला होता. आंतरराष्ट्रीय नंबरवरुन पुजारीने कॉल केला होता. त्यावेळी पुजारीने बिल्डरला जीवे मारण्याची धमकी देत २ कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली होती. पुजारीने व्यवसायीकाला कॉल करण्याचे सत्र सुरुच ठेवले. त्यानंतर बिल्डरने पुजारी विरोधात तक्रार दाखल केली.

त्यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर खंडणीविरोधी पथकानंही या प्रकरणाची चौकशी सुरु केली. सायबर सेलच्या मदतीनं मालाड पोलिसांनी पुजारीला बंगळुरुत पकडलं."अशी माहिती पोलिसांनी दिलीय. "आरोपीला अटक करण्यात आली आहे. तो कुठेही नोकरी करत नाही. आरोपीला संगणकाचं ज्ञान आहे." अशी माहिती मालाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय लिगाडे यांनी दिली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai Newscrime update
loading image
go to top