मुंबई पालिकेच्या पाच मराठी शाळा होणार बंद, वरळीतील दोन शाळांचा समावेश

समीर सुर्वे
Monday, 23 November 2020

वरळीतील पालिकेच्या दोन शाळा विद्यार्थ्यी नसल्याने बंद होणार आहे. वरळी, वडाळा, शिवडी अशा भागातील पाच मराठी शाळा पालिका बंद करणार आहे. वरळीतीलच एक तेलगु शाळाही बंद करण्यात येणार आहे.

मुंबई:  वरळी सीफेस येथील मुंबई पब्लिक स्कूल या मुंबई महापालिकेच्या इंग्रजी शाळेने देशात चौथा क्रमांक पटकावला. मात्र या शाळेपासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या वरळीतील पालिकेच्या दोन शाळा विद्यार्थ्यी नसल्याने बंद होणार आहे. वरळी, वडाळा, शिवडी अशा भागातील पाच मराठी शाळा पालिका बंद करणार आहे. वरळीतीलच एक तेलगु शाळाही बंद करण्यात येणार आहे.

महापालिका प्रशासनाने पाच मराठी शाळांसह एक तेलगु शाळा जवळील शाळेत विलीन करण्याचा प्रस्ताव आज शिक्षण समितीच्या पटलावर मांडला होता. हे प्रस्ताव शिक्षण समितीने राखून ठेवले आहेत.

अधिक वाचा-  दिवाळीनंतर तब्बल १२ हजार कोरोना रुग्णांची भर, मृत्यू नियंत्रणात

वरळी लेबर कॅम्प येथील मराठी शाळश क्रमांक दोन, वरळी नाका महापालिका शाळा क्रमांक दोन या दोन्ही शाळांमध्ये सध्याच्या परिस्थितीत एकही विद्यार्थी नाही. त्यामुळे या शाळा बंद करुन शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे जवळील शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. वडाळा येथील नाडकर्णी पार्क मराठी शाळा क्रमांक दोन या शाळेतही विद्यार्थ्यी नसल्याने बंद करण्यात येणार आहे.

अधिक वाचा-  आठवड्यानंतर स्थिती बघून मुंबई लोकल संदर्भात निर्णय घेणार: पालिका आयुक्त

शिवडी येथील शताब्दी सोहळा महापालिका मराठी शाळा या शाळांमध्ये तीन विद्यार्थी असल्याने या विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जवळील शाळेत समाविष्ट करण्यात येणार आहे. हे सहा प्रस्ताव आज शिक्षण समितीत मांडले होते. मात्र, शिक्षण समितीने हे प्रस्ताव राखून ठेवले असल्याचे शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोषी यांनी सांगितले.

--------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Five Marathi schools Mumbai Municipality closed including two schools Worli


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five Marathi schools Mumbai Municipality closed including two schools Worli