esakal | आठवड्यानंतर स्थिती बघून मुंबई लोकल संदर्भात निर्णय घेणार: पालिका आयुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

आठवड्यानंतर स्थिती बघून मुंबई लोकल संदर्भात निर्णय घेणार: पालिका आयुक्त

सामान्य नागरिकांना लोकल ट्रेननं प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली नाही. त्यात आता पुन्हा मुंबईत कोरोनानं डोकं वर काढलं आहे. दिवाळीनंतरच्या या सध्याच्या आठवड्याचा आढावा घेतल्यानंतरच मुंबई लोकल सुरु करण्याबाबत विचार करता येईल अशी माहिती इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे.

आठवड्यानंतर स्थिती बघून मुंबई लोकल संदर्भात निर्णय घेणार: पालिका आयुक्त

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे.  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात मुंबईची लाईफलाईनही बंद करण्यात आली होती. मात्र परिस्थिती काहीशी नियंत्रणात आल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात आली. मात्र अजूनही सामान्य नागरिकांना लोकल ट्रेननं प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली नाही. त्यात आता पुन्हा मुंबईत कोरोनानं डोकं वर काढलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता पुन्हा वाढताना दिसतोय. तर त्यात मुंबईकर आणि मुंबईजवळच्या महानगरातील सर्व चाकरमानी मुंबई लोकल कधी सुरु करणार या संभ्रमात आहेत. मात्र अशातच मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी लोकल सुरु करण्यासंदर्भात स्पष्टिकरण दिलं आहे. 

दिवाळीनंतरच्या या सध्याच्या आठवड्याचा आढावा घेतल्यानंतरच मुंबई लोकल सुरु करण्याबाबत विचार करता येईल अशी माहिती इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. 

दिवाळी झाल्यानंतरचा हा आठवडा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. या आठवड्यात कोरोना रुग्णांचा आकडा कितपत वाढतो हे पाहणं अत्यंत गरजेचं ठरणार आहे. गर्दी झालेल्या ठिकाणी लोकांच्या संपर्कात आलेले व्यावसायिक, हॉटेल चालक, भाजी बाजार या प्रत्येक ठिकाणी मुंबई पालिकेकडून कोरोना चाचणीची शिबिरं भरवण्यात आली होती, असंही आयुक्तांनी सांगितलं आहे. 

अधिक वाचा-  लोकलबाबत मंत्री विजय वडेट्टीवार यांचं 'महत्त्वाचं' विधान, सोबत 'मिनी' लॉकडाऊनचेही संकेत

तसंच दिवाळीच्या दिवसांत अनेक नागरिकांनी प्रवास केला आहे. दिवाळीसाठी गावी गेलेले किंवी सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी गेलेले मुंबईतले नागरिक आता पुन्हा परत येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळेच कोरोना रुग्णांचे या आठवड्यातील आकडे काय दर्शवतात? कोरोनाची स्थिती मुंबईत कशी असेल? यानंतर मुंबई लोकल सुरु करण्यावरील कोणताही निर्णय अवलंबून असले, असंही पालिका आयुक्त म्हणालेत.

सरसकट लोकल प्रवास लांबणीवर?

दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या मोठ्या वाढली आहे. त्या पार्श्वभुमीवर मुंबईत खबरदारीचा उपाय म्हणून आता, सरसकट लोकल प्रवासाचा प्रस्ताव काही काळ लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यासोबत लोकलमध्ये प्रवासाची मुभा मिळालेल्या काही घटकांच्या प्रवासाला ब्रेक लावण्याचे संकेत आहे. त्यामुळे मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी अजून काही दिवस धीर धरावा लागणार आहे.

अधिक वाचा-  संशयित वितरकाला पकडण्यासाठी गेलेल्या NCBच्या पथकावर हल्ला

मुंबईत सरसकट लोकल सुरु झाल्यास दिवसाला 80 लाखापेक्षा जास्त प्रवासी प्रवास करणार आहे. त्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यास, प्रशासनाने  एवढ्या मेहनतीने आटोक्यात आणलेली परिस्थिती, हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी लोकल प्रवास थोडा लांबवावा, एवढे महिने मुंबईकरांनी  तग धरला आहे. लोकल सुरु होण्यासाठी अजून काही दिवस त्रास सहन करावा अस मत रेल्वे अधिकाऱ्यासोबत राज्य सरकारचे अधिकारीही व्यक्त करताहेत. त्यामुळे अनेक दिल्लीत आलेल्या कोविड  लाटेमुळे लोकल प्रवासासंदर्भात पहिल्यांदा रेल्वे आणि राज्य सरकारमध्ये एकमत झाल्याचे चित्र आहे. 

will take decision regarding Mumbai local after week BMC Commissioner Iqbal Singh Chahal

loading image