Thane News: ठाणे जिल्ह्यात विषबाधेने चिमुकलीचा मृत्यू, कुटुंबातील चार जणांवर उपचार सुरू
Food Poisoning: भाईंदर पश्चिम येथे एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीनवर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून चार जणांवर उपचार सुरू आहेत.
भाईंदर : भाईंदर पश्चिम येथील जय बजरंग नगरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना रविवारी (ता. ७) रात्री घडली. यामध्ये एका तीनवर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर कुटुंबातील उर्वरित चार जणांवर उपचार सुरू आहेत.