esakal | ब्रेकिंग : मुंबईत आढळलेत कोरोनाचे पाच नवीन रुग्ण, नागपुरात आढळला आणखी एक
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रेकिंग : मुंबईत आढळलेत कोरोनाचे पाच नवीन रुग्ण, नागपुरात आढळला आणखी एक

कल्याण मधील एका ३ वर्षीय मुलीने केली कोरोनावर मात 

ब्रेकिंग : मुंबईत आढळलेत कोरोनाचे पाच नवीन रुग्ण, नागपुरात आढळला आणखी एक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्रात  रुग्णांनाच आकडा वाढतानादिसतोय. असा एकही दिवस नाही ज्यादिवशी महाराष्ट्रात आणि मुंबईत कोरोनाचा एकही  आदळला नाही. राज्यात आज पुन्हा कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. अशात चिंताजनक बाब म्हणजे या सहा रुग्णांमधील पाच रुग्ण मुंबईतील आहेत. या वाढलेल्या आकडेवारीमुळे महाराष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी १५९ वर गेलीये.

एकंदर देशाची स्थिती पाहता देशात कोरोना पॉझिटिव्ह १९ नवे रुग्ण आढळल्याने आता भारतातील करोना बाधित पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ८३० च्या वर गेलाय. दुरदैवाची बाब म्हणजे भारतात २० जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावलेत 

मोठी बातमी : आता सॅनिटायझरची कमी अजिबात भासणार नाही, नितीन गडकरींनी दिलेत हे आदेश..
  
महाराष्ट्रात आतापर्यंत पाच नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मुंबईत एका खासगी रुग्णालालायत आणि नवी मुंबीतही प्रयेकी एका नागरिकाचा नुकताच कोरणामुळे मृत्यू झालाय. मात्र असं असलं तरीही अनेक लोकं कोरोनाशी लढा देऊन यातून बरे देखील होतायत. कल्याण मधील एका ३ वर्षीय मुलीने कोरोनावर मात केलीये.

मात्र संपूर्ण महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढत चालल्याने  सरकारसमोर, आरोग्य यंत्रणेसमोर आणि सुरक्षा यंत्रणेसमोर मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मुंबईत  मार्केटमधील गर्दी हवी तितकी कमी हातानं पाहायला मिळत नाही. म्हणून मुंबईतील दादर मार्केट आता बंद करण्यात आलंय. गर्दी टाळण्यासाठी मुंबईतही दादर मार्केट सोमय्या मैदानात हलवण्यात आलंय.

(सदर आकडेवारी २८ मार्च  २०२० सकाळी ११ पर्यंतची आहे) 

five news corona positive patients detected in mumbai one found in nagpur