लोकांची नजर चुकवून १३ जण गेलेत धबधब्यावर पिकनिकला, तिथेच गाठलं मृत्यूने; गावावर पसरली शोककळा...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 July 2020

गुरुवारी पालघर जिल्ह्यातील जव्हारमध्ये पाच तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कालमांडवी धबधब्यावर गुरुवारी दुपारी हे तरुण गेले होते, यात अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.

मुंबई - गुरुवारी पालघर जिल्ह्यातील जव्हारमध्ये पाच तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कालमांडवी धबधब्यावर गुरुवारी दुपारी हे तरुण गेले होते, यात अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. काही तासांच्या शोधमोहिमेनंतर बचावकर्त्यांनी सायंकाळी त्यांचे मृतदेह बाहेर काढले, अशी माहिती पोलिसांनी दिली. लॉकडाऊन असल्यामुळे जिल्ह्यात दुकाने आणि सर्व कामे बंद आहेत. म्हणून तरुण पोहण्यासाठी या धबधब्यावर गेले होते. जव्हारपासून काही किलोमीटर अंतरावर हा कालमंडावी धबधबा आहे. 

जव्हारमधील अंबिका चौकातील एकूण 13 जण पिकनिकसाठी कालमंडवी धबधब्यावर गेले. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ते तिथे पोहोचले. त्यातले दोघं जण सेल्फी घेत होते. त्याच दरम्यान त्याचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले, असं जव्हारचे पोलिस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे म्हणाले.

शाब्बास! FAIR & LOVELY विरुद्धच्या लढ्याचं श्रेय मुंबईच्या 'या' तरुणीला

या दोघांना वाचवण्यासाठी अन्य तिघांनी पाण्यात उडी घेतली. पण ते सुद्धा बुडाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

  • देवेंद्र वाघ - वय 28
  • प्रथमेश चव्हाण- वय 20
  • देवेंद्र पलटणकर- वय 19
  • निमेश पाटील- वय 28
  • रिंकू भोईर- वय 22

अशी मृतांची नावे आहेत.

घटनेची माहिती कळताच लेंगरे आणि अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि शोधमोहीम सुरू केली. संध्याकाळी 7च्या सुमारास बचावकर्त्यांनी मृतदेह बाहेर काढले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

कोरोनावरील सर्वात प्रभावी अशा 'टॉसिलीझुमॅब'चा तुटवडा, परिणाम होंतोय नवी मुंबई ठाण्यातील रुग्णांवर...
 

आदिवासी शहरातील दाभोसा धबधब्यानंतर कालमंडावी धबधबा पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षण आहे. हा धबधबा कमीतकमी 100 मीटर खोल असून तो वर्षभर वाहत असतो. 

मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले असून पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्या याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

five people lost their life at kalmandavi waterfall at jawhar read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five people lost their life at kalmandavi waterfall at jawhar read full story