esakal | कोरोनावरील सर्वात प्रभावी अशा 'टॉसिलीझुमॅब'चा तुटवडा, परिणाम होंतोय नवी मुंबई ठाण्यातील रुग्णांवर
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनावरील सर्वात प्रभावी अशा 'टॉसिलीझुमॅब'चा तुटवडा, परिणाम होंतोय नवी मुंबई ठाण्यातील रुग्णांवर

कोरोना रुग्णांवर 'टॉसिलीझुमॅब' हे सर्वात प्रभावी असल्याने या औषधाला मोठी मागणी आहे.

कोरोनावरील सर्वात प्रभावी अशा 'टॉसिलीझुमॅब'चा तुटवडा, परिणाम होंतोय नवी मुंबई ठाण्यातील रुग्णांवर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोना रुग्णांवर 'टॉसिलीझुमॅब' हे सर्वात प्रभावी असल्याने या औषधाला मोठी मागणी आहे. मात्र मात्र मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश परिसरात केवळ एकच पुरवठादार असल्याने या औषधांचा मुंबई लगतच्या शहरांमध्ये तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे या शहरांत उपचार घेणाऱ्या रुग्णांची फरफट होत आहे. या शहरांमध्ये देखील हे औषध उपलब्ध करण्याची मागणी ऑल फूड ऍण्ड ड्रग्स सप्लायर लायसेन्स होल्डर फाउंडेशनने केली आहे.

राज्यात सध्या 77,260 ऍक्टिव्ह रुग्ण आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यातील साधारणता 3 टक्के रुग्ण म्हणजे 2484 रुग्ण गंभीर आहेत. या अधिकतर  रुग्णांमध्ये कोरोना सह इतर दीर्घकालीन आजार देखील आहेत. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी लागले. रुग्णांमधील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांना 'टॉसिलीझुमॅब' सारख्या महागडया इंजेक्शनची आवश्यकता आहे. 

शाब्बास! FAIR & LOVELY विरुद्धच्या लढ्याचं श्रेय मुंबईच्या 'या' तरुणीला

राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढतांना दिसते. मुंबई जवळील ठाणे जिल्ह्यात देखील गेल्या एका महिन्यापासून मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. आज ठाणे जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा 52,657वर पोहोचला आहे. या रुग्णांना 'टॉसिलीझुमॅब' इंजेक्शन उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र संपूर्ण ठाणे जिल्ह्यात हे औषध उपलब्ध नसल्याचा आरोप ऑल फूड ऍण्ड ड्रग्स सप्लायर लायसन्स होल्डर फाउंडेशन ने केला आहे. हे औषध एस. के. डिस्ट्रिब्युटर या पुरवठाराकडून पुरवले जाते. मात्र ही एजन्सी मुंबईतील घाटकोपर या ठिकाणी असल्याने बाकी शहरांमध्ये या आवश्यक इंजेक्शनचा पुरवठा होत नाही.

लॉकडाऊनच्या काळात रुग्णांच्या नातेवाईकांना हे औषध जाऊन आणणे शक्य होत नाही. शिवाय या औषधांच्या उपलब्धतेबाबत अनेक रुग्णालये तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना ही पुरेशी माहिती नाही. त्यामुळे रुग्णांची फरफट होत असल्याचे ऑल फूड ऍण्ड ड्रग्स सप्लायर लायसन्स होल्डर फाउंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले. त्यामुळे अनेक गंभीर रुग्णांना आपला प्राण गमवावा लागत असून हे इंजेक्शन आपल्या जिल्ह्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले नाही तर पुढे ही अनेक रुग्णांना याचा फटका बसू शकतो अशी भीती ही पांडे यांनी व्यक्त केली आहे.

सावधान ! ऑरेंज अलर्ट जारी, मुंबईमध्ये दोन दिवसात मुसळधार पाऊसाची शक्यता 

ऑल फूड ऍण्ड ड्रग्स सप्लायर लायसेन्स होल्डर फाउंडेशनने याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाला नुकतेच पत्र लिहीले आहे. या पत्रात त्यांनी ठाणे जिल्ह्यात हे इंजेक्शन उपलब्ध करण्याची मागणी केली असून जिल्ह्यातील इतर पुरवठादारांना हे इंजेक्शन पुरवण्याची परवानगी त्यांनी या पत्रात केली आहे. सध्याची आपत्कालीन परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ठाण्यातील पुरवठादारांना हे इंजेक्शन पुरवण्याची जबाबदारी एफडीए ची असून त्यांनी यावर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी पांडे यांनी केली आहे.
 

shortage of covid cure medicines in mumbai MMR area affecting badly on covid patients

loading image