मुंबई शहरात पाच वर्षांत पाच हजार सोनसाखळ्यांची चोरी

मंगेश सौंदाळकर 
सोमवार, 10 डिसेंबर 2018

मुंबई - मुंबई शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत पाच वर्षांत सोनसाखळी चोरीच्या ५ हजार १३४ घटना घडल्या असून, त्यातील २ हजार २६० प्रकरणांचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. पहिल्यांदा चोरी करून नंतर त्या करणे बंद करण्यासह विविध कारणांमुळे अशा प्रकरणांचा उलगडा होत नसल्याने चोरांचा शोध कसा घ्यायचा? असा प्रश्‍न पोलिसांसमोर उभा राहिला आहे.

२०१३ मध्ये मुंबईत सोनसाखळी चोरीच्या २ हजार ९० घटना घडल्या होत्या. अचानक वाढलेल्या चोरीच्या घटनांची दखल घेत पोलिसांना वाढीव बंदोबस्ताचे आदेश तत्कालीन आयुक्तांनी दिले होते. पहाटे आणि सायंकाळच्या वेळेस सोनसाखळी चोरीच्या घटना घडू शकतात, अशी ठिकाणे पोलिसांनी शोधून काढली होती. तिथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

काही चोरटे मुंबई महानगर प्रदेशातून चोऱ्या करण्यासाठी मुंबईत यायचे. मुंबईत सोनसाखळी चोरी करून पळून जात असायचे. त्यामुळे दहिसर आणि मुलुंड चेक नाका परिसरात पोलिसांनी गस्त सुरू केली. काही पोलिस ठाण्यांनी अशा चोरट्यांचा पाठलाग करण्याकरता व्यावसायिक बायकर्सची मदत घेतली. बायकर्सच्या मदतीने काही चोरट्यांना पोलिसांनी गजाआड केले होते. २६/११ च्या हल्ल्यानंतर मुंबईत ४ हजार ७४६ सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. गल्ली बोळापासून ते महत्त्वांच्या ठिकाणी सीसी टीव्ही बसवल्यामुळे सोनसाखळी चोरीचे प्रमाण कमी होत चालले असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

मौजमजेसाठी चोरी
अमली पदार्थाचे व्यसन आणि मौजमजा करण्यासाठी सहज पैसे उपलब्ध होतात म्हणून चोरटे सोनसाखळी चोरी करतात. खासकरून, सणाच्या दिवशी सोने घालून बाहेर पडणाऱ्या आणि पहाटेच्या वेळी मंदिरात जाणाऱ्या वृद्ध महिलांना चोरटे लक्ष्य करतात. सोनसाखळी चोर चोरलेल्या मोटरसायकलचा वापर गुन्ह्यासाठी करतात. चेहरा दिसू नये म्हणून हेल्मेट घालतात. काही मिनिटांत चोरी करून ते पसार होतात. 

Web Title: Five thousand chain snatching theft in five years