आता 'या' टिप्सचं पालन करा आणि बिनधास्त मागावा ऑनलाईन डिलेव्हरी...

आता 'या' टिप्सचं पालन करा आणि बिनधास्त मागावा ऑनलाईन डिलेव्हरी...

मुंबई : सध्या  संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यात हा रोग एकमेकांच्या संपर्कामुळे होत असल्याने आपण सर्वजण सोशल डिस्टंसिंग पाळतोय. जागतिक आरोग्य संघटना लोकांना वेळोवेळी हात स्वच्छ धुण्याचा संदेश दिला आहे आहे. मात्र घरपोच डिलिव्हर केलेल्या खाद्यपदार्थांना हाताळण्याबाबत योग्य माहिती सहज उपलब्ध नसल्याचं दिसून येतंय. मात्र आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्ही बाहेरून ऑनलाईन खाद्यपदार्थही मागवू शकता आणि कोरोनापासून बचावही करू शकता.

काही दिवस क्वारंटाइनमध्ये राहिल्यावर आपल्या सर्वांनाच हे लक्षात आलं आहे की या जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी घरात राहणं आणि स्वच्छता बाळगणं या गोष्टी अधिक महत्त्वाच्या आहेत. तसंच सध्याच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी सर्वांनीच आपलं दैनंदिन जीवन बदललं आहे. उदाहरणार्थ  बाहेरून आवश्यक वस्तू आणताना अधिक काळजी घेणं, विशेषतः घरपोच डिलिव्हर केलेल्या खाद्यपदार्थांची दक्षता घेणं.

घरपोच डिलिव्हर केलेल्या खाद्यपदार्थांची दक्षता कशी घ्यावी हे माहिती नसल्यामुळे बाहेरून जेवण ऑर्डर करण्याबद्दल अनेकांच्या मनात संकोच निर्माण होतो आहे. मात्र योग्य ती दक्षता घेतली तर या परिस्थितीतही पूर्वीप्रमाणे खाद्यपदार्थ ऑर्डर करणं शक्य आहे. घराबाहेर जाऊन खाद्यपदार्थ विकत घेण्यापेक्षा घरी ऑर्डर करणे अधिक सुरक्षित आहे कारण बाहेर गेल्यास विषाणू व जंतूंच्या संपर्कात येण्याची शक्यता अधिक आहे. हा विषाणू पसरण्यापासून रोखण्यासाठी डिलिव्हर केलेल्या खाद्यपदार्थांना कशाप्रकारे अनपॅक करावं हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

प्रतिष्ठित रेस्टोरंट्स व खाद्यपदार्थांची दारोदारी डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांनी विविध आरोग्यासंबंधित दक्षतेचं  पालन करून त्यांच्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचा मार्ग अवलंबला आहे. स्वच्छता बाळगून अन्न तयार करणं, ताजं अन्न शिजवणं, शेफ्सनी उपकरणांसंबंधी घेतलेली दक्षता, डिलिव्हरी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरी (कमीत कमी स्पर्श होईल याची काळजी घेऊन केलेली डिलिव्हरी), अशा काही महत्त्वाच्या गोष्टींचं विविध रेस्टोरंट्सच्या मालकांनी पालन केलं आहे. म्हणूनच अन्न दूषित होण्याची शक्यता अगदी कमी आहे यात कोणतीही शंका नाही.

अशी घ्या दक्षता:

  • अन्न घरपोच डिलिव्हर केलेल्या कर्मचाऱ्यांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होणार नाही याची दक्षता बाळगा.
  • फूड पॅकेज घरात आणताना हातात आवश्य ग्लोव्ह्ज घाला.
  • फूड पॅकेज टेबलावर ठेवताना, दुकानातून विकत घेतलेले जंतुनाशक वापरुन ती जागा व्यवस्थित सॅनिटाइझ करा.
  • त्याच फडक्यानं  पॅकेजही स्वच्छ पुसून घ्या.
  • स्वच्छ व स्टेरीलाइज केलेल्या भांड्यांमध्ये पॅकेजमधलं अन्न काढून ठेवल्यावर पॅकेज कचरा कुंडीत टाकून द्या.
  • त्यानंतर २० सेकंद हात स्वच्छ धुतल्यावर चेहऱ्याला हाताचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या.
  • हाताऐवजी घरातले चमचे-काटे वापरुन बाहेरून ऑर्डर केलेलं जेवण खा.
  • जेवणापूर्वी गरम आणि ताजं अन्न १-२ मिनिटं गरम करून घ्या.

बाहेरून ऑर्डर केलेले खाद्यपदार्थ काळजीपूर्वक हाताळून त्यांचं  सेवन केल्यामुळे ते ऑर्डर न करण्याचे कारणच उरणार नाही आणि तुम्ही कोरोनापासून स्वतःचा बचाव करू शकाल. त्यामुळे या टिप्सचं पालन करा आणि बिनधास्त बाहेरून जेवण मागवा.

follow these easy tips and order online food without hesitation in corona crisis

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com