esakal | आता तुमच्या EMI बद्दलच्या 'या' ७ गोष्टी अजिबात विसरू नका...
sakal

बोलून बातमी शोधा

आता तुमच्या EMI बद्दलच्या 'या' ७ गोष्टी अजिबात विसरू नका...

EMI स्थगित करण्यासाठी अनेकांकडून आपापल्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग साइटचा वापर करून ईएमआय स्थगित करण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. या ग्राहकांना लुटण्यासाठी घोटाळे करण्याची संधी शोधणारे घोटाळेखोर सातत्यानं  प्रयत्न करत आहेत.

आता तुमच्या EMI बद्दलच्या 'या' ७ गोष्टी अजिबात विसरू नका...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : सध्या  कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनमुळे अनेक लोकांना घरीच राहावं लागतंय. त्यामुळे त्यांना पगार मिळू शकत नाहीय. याच पार्श्वभूमीवर RBI नं बँकांना ग्राहकांच्या कर्जाच्या हफ्त्यांना स्थगिती देण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे काही बँकांनी ग्राहकांना ही सुविधा दिली. तर काही बँकांनी ग्राहकांना इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून EMI च्या स्थागितीसाठी अर्ज करण्यास सांगितले होते.

मुंबईच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

EMI स्थगित करण्यासाठी अनेकांकडून आपापल्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग साइटचा वापर करून ईएमआय स्थगित करण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. या ग्राहकांना लुटण्यासाठी घोटाळे करण्याची संधी शोधणारे घोटाळेखोर सातत्यानं  प्रयत्न करत आहेत. हे घोटाळेखोर ग्राहकांना कॉल करत आहेत. त्यांचे ईएमआय पुढे ढकलण्यासाठी बँकांनी जाहीर केलेल्या मॉरेटोरिअमचा फायदा घेण्यासाठी त्यांना ओटीपी विचारत आहेत. एकदा ग्राहकानं ओटीपी दिला की घोटाळेखोर ग्राहकांच्या खात्यातून तातडीनं पैसे काढून घेतात. अशा घोटाळेखोरांबद्दल जागृती करण्यासाठी आणि ग्राहकांचं  संरक्षण करण्यासाठी, आयसीआयसीआय बँकेनं  सुरक्षितपणे बँकिंग कसं  करावं याबद्दल काही महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत.

Coronavirus : धक्कादायक ! राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण

या ७ टिप्स ठेवा लक्षात:

(१) ओटीपी कोणासोबतही शेयर करू नका:

EMI किंवा व्याजदर भरणे पुढे ढकलण्यासाठी तुमचा OTP किंवा पासवर्ड मागण्यासाठी तुमची बँक कधीही तुम्हाला कॉल करत नाही किंवा ईमेल पाठवत नाही हे लक्षात ठेवा. ओटीपी, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नंबर, सीव्हीव्ही नंबर, नेटबँकिंग किंवा मोबाइल बँकिंग पासवर्ड, कस्टमर आयडी, यूपीआय पिन असा कोणताही गोपनीय किंवा खासगी तपशील बँक कर्मचाऱ्यासह कोणालाही कधीच देऊ नका.

(२) मोबाइल बँकिंग अप्लिकेशनवर ‘ऑटो सेव्ह’ आणि ‘ऑटो कम्प्लिट’ हे ऑप्शन बंद करून ठेवा: 

मोबाइल बँकिंग व इंटरनेट बँकिंग व्यवहार करत असताना, ऑटो फिल किंवा सेव्ह युजर आयडी किंवा पासवर्ड सुरू करू नका. हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी सोयीचं असलं तरी ते धोकादायक ठरू शकतं.

(३) फिशिंग टेक्स्टला प्रतिसाद देऊ नका :

अनभिज्ञ ठिकाणाहून आलेल्या URL चा वापर करू नका किंवा वैयक्तिक माहिती किंवा ऑनलाइन बँकिंग तपशील ईमेलद्वारे किंवा मेसेजवर कोणालाही देऊ नका. हा तुमची ओळख चोरणाऱ्या प्रयत्न असू शकतो.

VIDEO :: चीड आणणारी गोष्ट ; रेशनच्या गव्हात चक्क बांधकामात वापरली जाणारी खडी...

(४) व्हेरिफिकेशन कॉलपासून सावध राहा :

फेक कॉलर बँकेचा प्रतिनिधी किंवा बँकेच्या तांत्रिक टीममधला असल्याचं सांगतो. त्यानंतर  हा कॉलर ग्राहकांना त्यांचा वैयक्तिक तपशील आणि गोपनीय माहिती देण्यासाठी भाग पाडतात. याबद्दल जेव्हा संशय येईल तेव्हा बँकेला किंवा तुमच्या बँकेशी संबंधित वित्तीय सेवा संस्थेला कॉल किंवा ईमेल करा आणि या कॉलविषयी लगेच सांगा.

(५)  खातं  वेळोवेळी तपासा:

तुमच्या आर्थिक उलाढालींविषयी जाणून घेणेही महत्त्वाचं आहे. तुमच्या आर्थिक बाबींचा मागोवा घेण्यासाठी तुमची बँक खाती नियमित तपासा. प्रत्येक वेळी व्यवहार करत असताना, खात्यातील बॅलन्स पुन्हा तपासा आणि योग्य रक्कम भरल्याची किंवा स्वीकारल्याची खात्री करा. कोणतीही विसंगती आढळली तर तातडीनं तुमच्या बँकेशी संपर्क साधा.

(६) नोटिफिकेशचा पर्याय सुरू ठेवा:

तुमच्या बँकेकडून मिळणारे ईमेल व एसएमएस नोटिफिकेशन सुरु ठेवा. यामुळे तुमच्या खात्यातून होणाऱ्या व्यवहारांविषयी तुम्हाला माहिती मिळेल. संशयास्पद व्यवहार होत असल्याचं  ओळखण्यासाठी मदत होईल तसंच बँकेला वेळेत कळवता येईल.

मोठी बातमी - आता पत्रकारांच्या पाठीशी 'गुगल', उचललं 'हे' मोठं पाऊल...

(७) यूपीआय व्यवहार करत असताना सुरक्षेचे उपाय:

सुरक्षित व सुलभ पद्धतीनं  बँकिंग करण्यासाठी एनपीसीआयनं  यूपीआय पेमेंटची व्यवस्था  केली आहे. बँकिंगची अनेक वैशिष्ट्ये, फंड रुटिंग, कलेक्शन रिक्वेस्ट व पेमेंट रिक्वेस्ट सुरळितपणे करता येऊ शकतं.  पेमेंट करत असताना पिनची गरज लागते मात्र पेमेंट स्वीकारत असताना लागत नाही, हे लक्षात ठेवा. ग्राहकांनी स्क्रीन-शेअरिंग अप्लिकेशनवर मर्यादा घालाव्यात आणि पिन, कार्ड व ओटीपी यांचा तपशील कधीही कोणालाही देऊ नये. ग्राहकांनी केवळ विश्वासार्ह अप्लिकेशन डाउनलोड करावेत आणि एटीएम पिनप्रमाणे एम-पिन सांभाळावा व कोणालाही सांगू नये.

availing EMI moratorium please keep these things in mind read important tips 

loading image