

Food Safety
ESakal
मुंबई : मुंबईत घडलेल्या बिर्याणी-कलिंगड प्रकरणानंतर अन्नसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरुवातीला बिर्याणी आणि कलिंगड एकत्र खाल्ल्यामुळे ही घटना घडल्याची चर्चा होती; मात्र तज्ज्ञांनी याला कोणताही ठोस वैज्ञानिक आधार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेमागे अन्न दूषित होणे, फूड पॉइझनिंग किंवा रासायनिक परिणाम यांसारख्या शक्यता तपासल्या जात आहेत.