शिलाहार राजवटीच्या पाऊलखुणा पुसट 

विरार ः शिलाहार राजवटीतील मूर्ती.
विरार ः शिलाहार राजवटीतील मूर्ती.

विरार ः पालघर जिल्ह्यातील विखुरलेल्या ऐतिहासिक पाऊलखुणा आणि त्यांची दुरवस्था हे आता समीकरण बनले आहे, वर्षानुवर्षे याकडे दुर्लक्ष होत आहे. विरार प्रांतातील बावखळ पाडा विरार हायवे भागातील शिलाहार कालखंडातील पाऊलखुणाही नामशेष होण्याच्या मार्गावर असून अंतिम घटका मोजत आहेत. याची गांभीर्याने दखल घेऊन यांचे जतन आणि संवर्धन करावे, अशी इतिहासप्रेमींची मागणी आहे. 

उत्तर कोकणातील शिलाहार राजवटीच्या किमान 400 वर्षे जुन्या पाऊलखुणा पालघर जिल्ह्यातील विविध भागात विखुरलेल्या आहेत. यात वसई, तुंगार, विरार, गास, पारोळ आदी भागांचा समावेश असून येथील विखुरलेले अवशेष, त्यांचे संकलित नोंदणीकरण अगदी ब्रिटिश कालखंडापासून अपूर्ण अवस्थेत आहे. वाढत्या मानववस्तीच्या प्रभावात आणि इतिहासाची अनास्था यामुळे अत्यंत महत्त्वाचे अवशेष कायमस्वरूपी भुईसपाट झालेले आहेत.

...भाजपची एकहाती सत्ता येईल!

या अवशेषांचे पुढे काय होते, हे गुपितच आहे. विरार प्रांतातील बावखळ पाडा विरार हायवे भागात शिलाहार कालखंडातील मंदिराच्या अवशेषांत किचक, मंदिर द्वारपट्टी, श्री गणेश, कीर्तिमुख आदी शिळा अत्यंत वाईट अवस्थेत मातींत गाडल्या गेलेल्या आहेत. किल्ले वसई मोहिमेचे इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत गेली चार वर्षं बावखळ पाडा भागातील अवशेषांना भेटी देत आहेत; पण दर भेटीत हे अवशेष मूळ ठिकाण सोडून अधिकाधिक रस्त्याखाली वा मातीच्या ढिगाऱ्यात नामशेष होताना दिसत आहेत. त्यामुळे इतिहासाचा हा वारसा जपण्यासाठी महापालिका, जिल्हाधिकारी यांनी पुढे यायला हवे, अशी मागणी होत आहे. 

असा आहे इतिहास 
ऐतिहासिक संदर्भाचा मागोवा घेताना दक्षिण कोकणातील शिलाहार सत्ता उत्तरेस चौलपर्यंत पसरलेली होती आणि सुमारे 765 ते 1024 पर्यंत समुारे 250 वर्षं ती राज्य करत होती. ठाण्याच्या शिलाहारांच्या राज्यात उत्तर कोकण, सुरत जिह्याचा दक्षिण भाग व ठाणे, अलिबाग, रत्नागिरी हे तीन जिल्हे यांचा यांचा समावेश होतो. केशीदेव, अपरादित्य, हरिपालदेव, मल्लिर्जुन, अपरादित्य द्वितीय, सोमेश्‍वर या ठाणे शिलाहार राजांच्या राजवटीचे उल्लेख कोकणातील आगाशी, भिवंडी आदी ठिकाणी सापडलेल्या शिलालेखांतून मिळतो. उत्तर कोकणात शिलाहारांचे राज्य 400 वर्षे होते. उत्तर कोकणातील शिलाहारांचा कालावधी 800 ते 1265 असा मानण्यात येतो. यात प्रथम कपर्दी, पुलशक्तीपासून ते तृतीय अनंतदेव, सोमेश्‍वर असा समावेश होतो. शिलाहारांची कोकणातील सत्ता महादेव यादवाने सोमेश्‍वर शिलाहारांचा पराभव करून संपुष्टात आणली. या सर्व घडामोडींचा साक्षीदार असणाऱ्या वास्तू व अवशेष पालघर जिल्ह्यातील विविध भागात विखुरलेले आहेत. 

पालघर जिल्ह्यातील सर्वच ऐतिहासिक अवशेष अंतिम घटकेत असून त्यांचे नोंदणीकरण, संकलन, जतनीकरण, इतिहास लेखन, ऐतिहासिक पुरावे, अवशेषांची वर्णने आदी प्रदीर्घ कामे करण्यासाठी कायमस्वरूपी विशेष विभाग नेमून जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू संवर्धनाचा आदर्श निर्माण करून दिला पाहिजे. 
डॉ श्रीदत्त राऊत, उत्तर कोकणचे इतिहास अभ्यासक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com