esakal | 'CET' झाल्याशिवाय एकही प्रवेश नाही, शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

admission

'CET' झाल्याशिवाय एकही प्रवेश नाही, शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी (Eleventh Admission) यंदा प्रथमच प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रवेश परीक्षा होऊन निकाल जाहीर (CET Exam) होईपर्यंत अकरावीचे कोणतेही प्रवेश होणार नाहीत असे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाने (Education Section) दिले आहेत. यामुळे इन हाउस कोटा, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यातील जागांवर प्रवेश कसे करायचे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ( For Admission CET Exam process no admission till result Declaration-nss91)

इयत्ता दहावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी राज्य शिक्षण मंडळाने प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. यामुळे राज्यातील राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व ज्युनिअर कॉलेजांमध्ये प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश दिले जाणार आहेत. या विद्यार्थ्यांचे प्रवश संपल्यानंतर उर्वरित जागांवर इतर विद्यार्थ्यांना दहावीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार प्राप्त गुणांच्या आधारे प्रवेश दिले जाणार आहेत. यामुळे अकरावी प्रवेश परीक्षेची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत इयत्ता अकरावीमध्ये कोणतेही प्रवेश देता येणार नाही असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी काढलेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा: इंग्रजी शाळा संस्थाचालकांची शिक्षणमंत्री हटाव मोहीम; लाखो पालकांचा पाठिंबा

यामुळे सध्या कोणीही अकरावी प्रवेश घेऊ नयेत असे आवाहनही शिक्षण विभागाने केले आहे. दरम्यान, ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कॉलेजांना इनहाउस, अल्पसंख्याक आणि मॅनेजमेंट कोट्यातील जागांवरही प्रवेश करता येणार नाही. यामुळे याबाबत अधिक स्पष्टीकरण देण्याची मागणी कॉलेजांकडून होत आहे.

loading image