राणीची बाग खुले ना ! वाघोबाचे दर्शन मिळे ना !!, बच्चे कंपनीची महापौरांना साद

राणीची बाग खुले ना ! वाघोबाचे दर्शन मिळे ना !!, बच्चे कंपनीची महापौरांना साद

मुंबई: जवळपास वर्षभर होत आलेल्या कोरोनाच्या काळात घरो घरी असलेल्या बच्चे कंपनी, शालेय विद्यार्थी यांचा दैनिक मैदानी खेळ, बागेत फेर फटका आणि रविवार किंवा जोडून आलेल्या सुट्टीत राणी बाग, मत्स्यालय, म्हतारीचा बूट, कमला नेहरू पार्क, वरळीचे तारांगण, दादर- गिरगाव चौपाटी, भाऊचा धक्का, गेटवे ऑफ इंडिया आणि घारापूरी लेणी आदी पाहण्याचा योग हरवूनच बसलेला आहे. यात सर्वात जास्त प्रायोरिटी शालेय विद्यार्थी आणि बच्चे कंपनी जर कोणती असेल तर ती भायखळा येथील राणीबागेतील वाघोबा आणि पेंग्विन भेट दर्शनाची.

गेल्या 10 महिन्यापासून कोरोना संसर्गमुळे जनतेच्या जीवाची काळजी असल्याने सरकारने राणीबाग दर्शन आणि विविध प्रेक्षणीय स्थळी प्रवेश बंद केलेला असल्याने विशेषत: मुंबईतील छोट्या छोट्या  घरात एक प्रकारे बंदिस्त असलेल्या मुलांना तसेच वयोवृद्धाना फारच कोंडल्यासारखे झालेले आहे. मुंबईत लॉकडाऊन अनलॉक झालेला असला तरी कधी एकदा प्रत्यक्ष राणीचा बाग येथे जाऊण पिंज-यातील बंदिस्त प्राणी वाघोबा, गजराज हत्ती, तरस, लांडगे, पाण घोडा, मगर, विहिरीतील, बागड़णारी हरणे,काळवीट, ससोबा, सर्प, अजगर, माकड, पिसारा फुलवून नाचणारे मोर, लांडोर, पोपट आणि विविध पक्षी तसेच बागेतील सुंदर आकार देत छाटण्यात आलेली नक्षीदार छोटी मोठी वृक्षे, झुडपे आणि बागेतील वनराईत रंगीबेरंगी फुलांनी बहरलेली वृक्षवल्ली यांच्या बरोबरच मोठे आकर्षण असलेली पेंग्विनची गुहा पाहण्याचा दुग्ध शर्करा योग कधी एकदा येईल अशी आस लावून बच्चे कंपनी बसलेली पहायला मिळत आहे.

सकाळी उठल्यावर आंघोळ नंतर चहा नाष्टा नंतर शाळेचे ऑनलाईन शिकवणी वर्ग, अभ्यास, टीव्ही मालिका, कार्टून्स आणि मोबाईलवरील गेम्स खेळून आता मात्र बच्चे कंपनी जाम वैतागली असल्याचे माधुरी गायकवाड, संगिता शर्मा, वेदिका वास्कर, फाल्गुणी नारकर, वैष्णवी नारकर सांगतात.

सरकारने निदान राणीचा बाग लहान मुलांसाठी उघडल्यास वर्षभर घरात कोंडून राहिलेल्या लहान मुलांना आणि वयोवृद्ध ना प्रत्यक्ष निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ आनंदात राहता येईल. मास्क,सुरक्षित अंतर ठेवण्याची काळजी लोक नक्कीच घेतील.

आम्ही टिव्हीवर डिस्कवरी चॅनलवर आणि चित्रपटांत वाघ पाहतो. पण प्रत्यक्ष पहायला एकच ठिकाण आहे ते म्हणजे राणीची बाग येथे वाघोबा पाहण्याची एक वेगळीच गंमत असते असे वेदांत नारकर, रिद्धि गायकवाड आणि धविन सादये या शालेय विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी राणीबाग लवकर उघडावा अशी विनंती करीत आहेत.

आम्ही पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना राणी बाग लोकांसाठी सुरु करण्या संदर्भात प्रस्ताव पाठविलेला आहे. आयुक्त त्यासंदर्भात निर्णय घेतील.
संजय त्रिपाठी, अधिक्षक, वीरमाता जिजामाता उद्यान -राणीबाग

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

forced reopening Veermata Jijabai Bhonsale Udyan Byculla Zoo

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com