Mumbai: पोटात लपवले ७.८५ कोटी रुपयांचे कोकेन: विमानतळावर परदेशी नागरिकास अटक; एक्सरे काढल्यानंतर प्रकार उघड
Latest Mumbai News: सामानात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही, मात्र हा प्रवासी अस्वस्थ वाटत असल्याने त्याचा एक्सरे करून घेण्यात आला. तेव्हा त्याच्या पोटात असंख्य गोळ्या किंवा कॅप्सूल आढळल्या. त्याबाबत चौकशी केली असता कॅप्सूलमध्ये कोकेन असल्याचे प्रवाशाने सांगितले.
Foreigner Arrested with ₹7.85 Crore Cocaine Hidden in Stomach at AirportSakal
मुंबई : कोकेनचा साठा शरीरात दडवून भारतात आलेल्या परदेशी प्रवाशास कस्टम विभागाने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. या प्रवाशाच्या शरीरातून ७८५ ग्रॅम कोकेन हस्तगत केले. या साठ्याची किंमत ७.८५ कोटी रुपये असावी, असे कस्टम विभागाने सांगितले.