

Sanjay Gandhi National Park
ESakal
मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (नॅशनल पार्क)अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसन प्रक्रियेला आता वेग आला असून, १६,४७८ अतिक्रमणधारकांची प्राथमिक यादी वन विभागाने प्रसिद्ध केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही पुनर्वसनाची प्रक्रिया राबवली जात आहे, या यादीतील रहिवाशांना आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी १७ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे.