esakal | 'रिक्षा चालकांचे तीन महिन्यांचे कर्ज माफ करा'; वाचा कोणी केली महत्वपुर्ण मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

'रिक्षा चालकांचे तीन महिन्यांचे कर्ज माफ करा'; वाचा कोणी केली महत्वपुर्ण मागणी

लॉकडाऊन काळात रिक्षा आणि टॅक्सी व्यवसाय पूर्णपणे बंद राहिल्याने चालक-मालक पूर्णपणे आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांना आर्थिक मदत करून तीन महिन्यांचे कर्ज माफ करा, अशी मागणी रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

'रिक्षा चालकांचे तीन महिन्यांचे कर्ज माफ करा'; वाचा कोणी केली महत्वपुर्ण मागणी

sakal_logo
By
रविंद्र खरात

कल्याण  : लॉकडाऊन काळात रिक्षा आणि टॅक्सी व्यवसाय पूर्णपणे बंद राहिल्याने चालक-मालक पूर्णपणे आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांना आर्थिक मदत करून तीन महिन्यांचे कर्ज माफ करा, अशी मागणी रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. याबाबत पेणकर यांनी कल्याण तहसीलदार आणि कल्याण उप प्रादेशिक कार्यालयात निवेदनही दिले आहे.

मुख्यमंत्र्यांचा बनावट आक्षेपार्ह फोटो ट्वीटरवर अपलोड करणा-या महिलेला अटक; राजकीय आयटी सेलशी संबधीत असल्याचा संशय?

रिक्षा-टॅक्सी चालकांना आर्थिक समस्येमधून बाहेर काढण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी रिक्षा आणि टॅक्सी संघटना प्रतिनिधी यांची ट्रान्सपोर्ट टास्क फोर्सची समिती बनवली आहे. त्यांचा अहवाल सकारात्मक आहे, मात्र अद्याप सरकारचा ठोस निर्णय न झाल्याने रिक्षा आणि टॅक्सी चालक मालक दिवसेंदिवस आर्थिक गर्तेत सापडत आहेत. दिल्ली, कर्नाटक, आंध्रप्रदेश प्रमाणे राज्यातील रिक्षा टॅक्सी चालकांना आर्थिक मदत द्यावी, त्यांचे तीन महिन्याचे कर्ज माफ करावे , माथाडी कामगारांच्या धर्तीवर रिक्षा चालक कल्याणकारी महामंडळ अंमलबजावणी करावी आदी मागण्यांचे निवेदन अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी दिले. यावेळी विशाल वैद्य, संतोष नवले, जितेंद्र पवार, बापू चतुर, संजय बागवे आदी उपस्थित होते.

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image