esakal | ...हा तर महाराष्ट्र, बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रकार | Aryan Khan case
sakal

बोलून बातमी शोधा

arvind sawant, aryan khan

...हा तर महाराष्ट्र, बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रकार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सापडल्यानंतर बॉलिवूडमध्ये मोठे वादंग निर्माण झाले. यानंतर अनेकजण बॉलिवूडच्या बाजूने उभे झाले तर अनेकांनी या प्रकरणाचा विरोध केला. आता शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद सावंत यांनी हा प्रकार म्हणजे महाराष्ट्र आणि बॉलिवूडला बदनाम करण्याचा असल्याचे म्हटले आहे.

राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकांना पचेनासे झाले आहे, कोणत्याही प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेक मंत्र्यांच्या मागे ईडीला लावले आहे. कारवाईचा धाक दाखवून सरकार पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, त्यांना यात यश मिळत नाही आहे. सततच्या कारवाईवरून सीबीआय, ईडी, आयकर अशा सर्व केंद्रीय यंत्रणांना कोणतेही काम नसल्याचे दिसत आहे, असेही खासदार अरविंद सावंत म्हणाले.

देशातील भ्रष्ट माणसे एकट्या महाराष्ट्रात राज्यातच आहेत, अशा पद्धतीने या यंत्रणांद्वारे काम सुरू आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना बदनाम केल्यानंतर बॉलिवूडला बदनाम करण्याच्या प्रकार यंत्रणांद्वारे सुरू आहे. यातून महाराष्ट्राच्या अर्थकारणावर परिणाम होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा: तलावात पोहोत होते सत्तर लोक तरीही गेला तरुणाचा जीव

बंदला सर्वच पक्षांनी पाठिंबा

महाविकासआघाडीतील पक्षांनी सोमवारी (११ ऑॅक्टोबर) महाराष्ट्र बंद पुकारला आहे. मात्र, या बंदमध्ये शिवसेना सहभागी होणार आहे. शिवसेनेच्या सर्व आघाड्या, भारतीय कामगार सेना या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. बंदला सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला आहे. डावे पक्ष, सर्व संघटना, युनियन या बंदमध्ये असणार आहेत, असेही अरविंद सावंत म्हणाले.

loading image
go to top